Govt Job: पत्रकारितेमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी 'प्रसार भारती'मध्ये नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. प्रसार भारतीकडून मोठ्या पदांसाठी भरतीचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं असून यामध्ये गेस्ट कोऑर्डिनर, प्रसारण कार्यकारी, व्हिडिओग्राफर आणि कॉपी एडिटर अशा इतर पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार avedan.prasarbharati.org या प्रसार भारतीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीच्या माध्यमातून एकूण 14 पदे भरली जाणार आहे.
ADVERTISEMENT
कॉपी एडिटर पदासाठी पात्रता
प्रसार भारतीमध्ये कॉपी एडिटर पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पत्रकारिता, जनसंवाद (Mass Communication) यासंबंधी क्षेत्रात डिग्री किंवा पीजी डिप्लोमा सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. यासोबतच, उमेदवारांचं हिंदी आणि इंग्रजी भाषांवर सुद्धा चांगलं प्रभुत्व असणं गरजेचं आहे. याशिवाय, या पदांसाठी उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रात किमान 7 वर्षांचा कामाचा अनुभव असणं अनिवार्य आहे. या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना दरमहा 80,000 रुपये वेतन दिलं जाईल.
व्हिडीओग्राफरच्या पदांसाठी भरती
प्रसार भारतीकडून व्हिडीओग्राफरच्या चार पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांनी 12 वी नंतर कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून सिनेमॅटोग्राफी किंवा व्हिडीओग्राफी क्षेत्रात डिग्री किंवा डिप्लोमा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसेच, यामध्ये 4K आणि डीएसएलआर कॅमेरा चालवणे, मोबाईल जर्नलिज्म आणि शॉर्ट फिल्म मेकिंगमध्ये अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल. यासोबतच, उमेदवारांना संबंधित क्षेत्रात किमान 5 वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे. व्हिडीओग्राफर पदावर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 50,000 रुपये वेतन दिलं जाईल.
हे ही वाचा: लेस्बियन गर्लफ्रेंडसोबत संबंध टिकवण्यासाठी महिलेने केला 5 महिन्याचा बाळाचा खून
प्रसारण कार्यकारी पदासाठी अर्ज...
प्रसारण कार्यकारी पदाच्या दोन जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे जनसंवाद (Mass Communication), टी.व्ही प्रोडक्शन तसेच यासंबंधी क्षेत्रात डिग्री किंवा पीजी डिप्लोमा असणं अनिवार्य आहे. यासोबतच, हिंदी भाषेवर प्रभुत्व असलं पाहिजे. भरती करताना हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल. या पदासाठी उमेदवाराकडे किमान 5 वर्षांचा अनुभव असणं गरजेचं असून नियुक्त झाल्यानंतर उमेदवारांना दरमहा 50,000 रुपये वेतन दिलं जाईल.
गेस्ट ऑर्डिनेटरच्या पदांसाठी पात्रता
गेस्ट ऑर्डिनेटरच्या चार पदांसाठी भरती केली जाणार असून यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. यासोबतच, जनसंवाद किंवा पत्रकारिता क्षेत्रात डिप्लोमा सुद्धा असणं अनिवार्य आहे. तसेच, या पदासाठी संबंधित क्षेत्रात 3 वर्षांचा अनुभव ग्राह्य धरला जाणार असून या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना 50 ते 55 हजार रुपये वेतन दिलं जाणार आहे.
प्रसार भारतीच्या सर्व पदांसाठी उमेदवारांसाठी 40 वर्षे कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
ADVERTISEMENT











