10 वी पास तरुणांना मोठी संधी, गृह मंत्रालयाकडून मेगाभरती, गुप्तचर यंत्रणेत नोकरी!

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंटेलिजन्स ब्यूरो (IB) कडून सब्सिडिअरी इंटेलिजन्स ब्यूरो (SIB) मध्ये सिक्योरिटी असिस्टंट आणि एक्झीक्यूटिव्हच्या 4987 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

गृह मंत्रालयाकडून मोठी भरती

गृह मंत्रालयाकडून मोठी भरती

मुंबई तक

24 Jul 2025 (अपडेटेड: 25 Jul 2025, 05:26 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

इंटेलिजन्स ब्यूरो (IB) कडून 4987 पदांसाठी भरती

point

देशाच्या गुप्तचर यंत्रणेत सामील होण्याची संधी

point

कुठे आणि कसा कराल अर्ज?

Govt Job: सरकारी नोकरीच्या प्रयत्नात असलेल्या आणि देशाच्या गुप्तचर यंत्रणेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंटेलिजन्स ब्यूरो (IB) कडून सब्सिडिअरी इंटेलिजन्स ब्यूरो (SIB) मध्ये सिक्योरिटी असिस्टंट आणि एक्झीक्यूटिव्हच्या 4987 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी 26 जुलै 2025 रोजी अर्जाची प्रक्रिया सुरू होणार असून उमेदवार 17 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.

हे वाचलं का?

रिक्त जागांमध्ये 2471 जागा अनारक्षित असून 1015 जागा ओबीसी (OBC), 501 जागा ईडब्ल्यूएस (EWS), 574 जागा एससी (SC) आणि 426 जागा एसटी (ST) प्रवर्गातील उमेदवारांसाठी आरक्षित असणार आहेत.

शैक्षणिक पात्रता 

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला स्थानिक भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. याशिवाय, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.

वेतन- 21,700 रुपये ते 69,100 रुपये (लेव्हल 3)

हे ही वाचा: वहिनीच्या भांगेत भरलं सिंदूर अन् एकत्र घेतली धबधब्यात उडी... सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

अर्जाचं शुल्क 

अर्ज करण्यासाठी सामान्य (General), ईडब्ल्यूएस (EWS), ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांना 650 रुपये तर एससी (SC) आणि एसटी (ST) प्रवर्गातील उमेदवारांना 550 रुपये शुल्क भरावे लागेल. तसेच सर्व महिला उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 550 रुपये आकारण्यात येईल. ऑनलाइन माध्यमातून अर्जाचं शुल्क भरता येईल.

वयोमर्यादा 

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय किमान 18 वर्षे तर कमाल 27 वर्षे असणं अनिवार्य आहे.

हे ही वाचा:  पतीला बघितलं मेहुणीसोबत फिरताना, पत्नीची सटकली अन् थेट हेल्मेटनंच...व्हिडिओ व्हायरल

कसा कराल अर्ज?  

सर्वप्रथम गृह मंत्रालयाच्या mha.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.

होम पेजवरील भरतीसंदर्भातील अर्जाच्या लिंकवर क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्या.

नोंदणी झाल्यानंतर लॉगिन करून लक्षपूर्वक अर्ज भरून घ्या.

अर्ज भरल्यानंतर सर्व माहिती तपासा आणि आवश्यक डॉक्यूमेंट्स अपलोड करून अर्जाचं शुल्क भरा.

अर्ज सबमिट केल्यानंतर भविष्यासाठी त्याची प्रिंटआउट काढून सुरक्षितरित्या ठेवा.

    follow whatsapp