Crime News: मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. दिर आणि वहिनीचा खोलीत रोमान्स सुरू असताना अचानक महिलेच्या पतीने दरवाजा उघडला आणि त्याने नको ते पाहिलं. पतीने "हे सगळं काय सुरु आहे?" याबद्दल पत्नीला आणि तिच्या दिराला जाब विचारला. महिला आणि तिच्या दिराने या सगळ्या प्रकाराला विरोध करत असं काहीच नसल्याचं पतीला सांगितलं. परंतु, नवऱ्याने त्याच्या डोळ्यांनी सर्व काही पाहिलं होतं. आता काहीच होऊच शकत नसल्याची महिलेला जाणीव आणि आपलं प्रकरण उघडं पडू नये, यासाठी तिने दिराच्या मदतीने आपल्या पतीची हत्या केली.
ADVERTISEMENT
पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
पतीच्या हत्येनंतर महिला आणि तिच्या दिराने हत्येला अपघात असे सांगून पोलिसांची दिशाभूल करायला सुरुवात केली. त्यावेळी आपला नवरा पलंगावरून खाली पडला आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्याचं महिलेनं पोलिसांना सांगितलं. परंतु, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सगळंच स्पष्ट झालं. रिपोर्ट्सवरुन संबंधित पतीची गळा दाबून हत्या झाल्याचं उघडकीस आलं. त्यानंतर दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला असून सध्या दोघेही तुरुंगात आहेत.
सागर जिल्ह्यातील बरायठा पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात 25 वर्षीय तरुणाची गळा दाबून हत्या करण्यात आली. पोलिसांच्या मते, मृत व्यक्तीच्या पत्नीचे तिच्या दिरासोबत अनैतिक संबंध होते. एका रात्री आरोपी महिलेच्या पतीने त्या दोघांना एकत्र खोलीत पाहिलं. प्रकरण उघडं पडू नये, यासाठी पत्नी आणि तिच्या दिराने मिळून त्याची हत्या केली.
हे ही वाचा: शेतात सापडले नव्या नवरीचे कपडे; ड्रोन उडवून पाहिलं तर... हनीमूनचं 'ते' रहस्य आलं समोर!
पलंगावरून खाली पडून मृत्यू झाल्याचं खोटं कारण...
बरायठा पोलीस स्टेशनमध्ये वीरेंद्र कुमार नावाच्या तरुणाच्या मृत्यूची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता वीरेंद्रचा मृतदेह त्याच्या घरातील एका खोलीत पडला होता. त्यावेळी वीरेंद्रची पत्नी आणि त्याच्या धाकट्या भावाने पलंगावरून खाली पडल्याने विरेंद्रचा मृत्यू झाल्याचं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्ट्सवरून गळा दाबून वीरेंद्रची हत्या केल्याचं स्पष्ट झालं. या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आणि लवकरच सगळ्याचा खुलासा करण्यात आला.
हे ही वाचा: Honeymoon झाल्यानंतर पत्नी म्हणाली - 'थांब मी येतेय', घेऊन आली दूध अन् पतीचा मूडचा बदलला; पण...
पोलिसांनी घेतलं ताब्यात
पोलिसांनी मृत व्यक्तीची पत्नी आणि त्याच्या धाकट्या भावाची चौकशी केली असता त्या दोघांनी आपला गुन्हा कबूल केला. दिर आणि वहिनीचे अनैतिक संबंध असून त्या दोघांना महिलेच्या पतीने एकत्र खोलीत पाहिलं होतं. त्यावेळी त्यांच्यात मोठा वाद झाला आणि पत्नीने तिच्या दिराच्या मदतीने वीरेंद्रचा गळा दाबून खून केला. पोलिसांनी आरोपी पत्नी आणि मृताच्या धाकट्या भावाला अटक करून तुरुंगात पाठवलं आहे.
ADVERTISEMENT
