आईनं 4 वर्षाच्या लहान मुलीला बसवलं चप्पलांच्या रॅकवर, 12 व्या मजल्यावरून गेला तोल.. CCTV मध्ये व्हिडिओ कैद

Palghar viral news : काळीज पिळवटून टाकणारी धक्कादायक घटना पालघरमध्ये घडली आहे. इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून 4 वर्षांची मुलगी खिडकीतून खाली पडली, या घटनेनं पालघर हादरून गेलं आहे.

Palghar viral news

Palghar viral news

मुंबई तक

25 Jul 2025 (अपडेटेड: 26 Jul 2025, 08:18 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पालघर हादरून गेलं

point

आईच्या डोळ्यादेखत लहान मुलीचा मृत्यू

Palghar viral news : आई आणि मुलाच्या नात्यासारखं या जगात कोणतंच नातं नाही. पण आईने आपलं मुल 12 व्या मजल्यावरून पडताना पाहिलंय. हे पाहून त्या आईच्या यातना काय झाल्या असतील याची कोणी विचारही करू शकत नाही. अशीच एक काळीज पिळवटून टाकणारी धक्कादायक घटना पालघरमध्ये घडली आहे. इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून 4 वर्षांची मुलगी खिडकीतून खाली पडली, या घटनेनं पालघर हादरून गेलं आहे. आईनं आपल्या मुलीला पाहिलं असता, तिच्या पायाखालची जमीन सरकली. 

हे वाचलं का?

हेही वाचा : लग्नात दीराने वहिनीसोबत केला डान्स अन् थेट पोलीसच पोहोचले...नेमकं घडलं काय? 

नेमकं काय घडलं? 

आपलं मुल एवढ्या उंचीवरून पडल्यानं जिवंत राहणार नाही, हा विचार करून आई आरडाओरड करू लागली. आता सर्व काही संपले असं तिला वाटू लागलं. तिचा संसारच उद्ध्वस्त झाल्याचं चित्र तिच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. 

मृत झालेल्या लहान मुलीचं नाव अन्विका असल्याची माहिती समोर आली आहे. पालघर येथील नायगाव येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. आई आणि मुलगी बाहेर जाण्याच्या तयारीतच होत्या. आईनं मुलीला चप्पल घालण्यास सांगितली आणि तिला चप्पलच्या स्टँडवर बसवले होते. मुलगी लहान असल्याने ती निश्चितच खेळकर होती, तेव्हा तिथून ती खिडकीजवळ गेली असता, तिचा तोल गेला आणि ती जमिनीवर पडली. 

घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद 

मन सुन्न करून टाकणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून हा व्हिडिओ पाहून लोक हैराण झालेत. या वृत्तामुळे सर्व पालक आपल्या लहान मुलांच्या काळजीबाबत सतर्क झाले आहेत. आई नऊ महिने नऊ दिवस गोळ्याला पोटात वाढवते आणि त्याच आईला आता काय वाटत असेल, असा विचार करूनही मन हेलावून जातंय. 

हेही वाचा : Pune News : पतीनेच बेडरूममध्ये लावले कॅमेरे, पत्नीचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड झाले, पतीनं मुद्दम केलं...

आईने मुलाला चप्पल घालण्यासाठी चप्पलांच्या रॅकवर बसवले होते, तेव्हाच अंतिम क्षणी आई चप्पल घालण्यासाठी गेली असता, लहान मुलीचा तोल गेला. त्यानंतर आई खाली धावू लागली, तिनं आपल्या लहान मुलासाठी धाव घेतली पण तिला कळालं की, आता आपलं लहान मुल वाचणार नाही, एवढ्यातच अनर्थ घडला. 

    follow whatsapp