Pune: पतीनेच बेडरूममध्ये लावले कॅमेरे, पत्नीचे अश्लील व्हिडिओ केले रेकॉर्ड

मुंबई तक

Pune News : पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीने पैशांसाठी आपल्याच पत्नीचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले.

ADVERTISEMENT

Pune News
Pune News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यात धक्कादायक प्रकार उघडकीस

point

पतीनेच बेडरूममध्ये लावले कॅमेरे

point

नेमकं काय घडलं?

Pune News : पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीने पैशांसाठी आपल्याच पत्नीचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले. पत्नीचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर पतीच आपल्या पत्नीला ब्लॅकमेल करू लागला आणि तिच्याकडून पैशांची मागणी करू लागला. पीडित महिला ही सरकारी अधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनं पुन्हा एकदा राज्याची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्यात भंयकर प्रकार उघडकीस आला. 

हेही वाचा : लग्नात दीराने वहिनीसोबत केला डान्स अन् थेट पोलीसच पोहोचले...नेमकं घडलं काय?

बेडरूममध्ये पतीने बसवले कॅमेरे

पत्नीचं वय वर्षे 31 असून पतीने तिच्या बेडरूममध्ये गुप्तपणे एक कॅमेरा बसवल्याचा पत्नीने आरोप केला आहे. त्यानंतर पत्नीने आरोप केला की, तिचा पती दीड लाख रुपयांची मागणी करून तिला अनेकदा मानसिक त्रास देत होता. तिचं अनेकदा शारीरिक शोषण केलं होतं. प्रसारमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, पतीकडे गाडीचा हप्ता भरण्यासाठी पैसे नसल्याने नराधम पतीने हे कृत्य केलं आहे. मीडियीच्या रिपोर्टनुसार, पतीने पत्नीचा व्हिडिओ बनवला आणि गाडीचा हप्ता भरण्यासाठी तिला ब्लॅकमेल करण्यात आले. 

विशेष बाब म्हणजे, आरोपी पती देखील सरकारी कर्मचारी आहे. त्याने बाथरूममध्येही कॅमेरे लावले होते. पोलिसांनी सांगितलं की, महिलेच्या तक्रारीवरून तिचा पती, सासू, तीन नणंद आणि दोन नातवांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

हेही वाचा : परपुरूषासोबत पत्नी हॉटेलमध्ये नग्न अवस्थेत, पत्नीचा नवरा पोहोचताच प्रियकर भररस्त्यात विवस्त्रच...

पीडितेच्या मनातील सल 

संबंधित प्रकरणात आंबेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडितेचं सर्व म्हणणं ऐकून घेतलं. पीडितेनं सांगितलं की, सासरच्यांकडून मानसिक छळासह शारीरीक छळ करण्यात आला. संबंधित प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, पीडितेवर तिच्या पती आणि इतर काही नातेवाईकांकडून अत्याचार करण्यात आले. जेव्हा महिलेला घरातून पैसे आणण्यास नकार देण्यात आला तेव्हा तिला मारहाणही करण्यात आली, असा तिनं आरोप केला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp