Crime News: उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातून चकित करणारं प्रकरण समोर आलं आहे. लग्नाच्या दिवशी वर आणि वधू अतिशय आनंदात होते. सात जन्म एकत्र राहण्याची वचन देत दोघांचं लग्न अगदी थाटामाटात पार पडलं. मात्र, लग्नानंतर वधूचा एक वेगळाच प्लॅन होता. दोन्ही घरात उत्साहाचं वातावरण असताना कोणालाच नवी नवरी पुढे नेमकं काय करणार, याची कल्पनाच नव्हती. लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच नवरी भलतंच काहीतरी करुन बसली आणि यामुळे नवऱ्यासोबतच त्याच्या कुटुंबियांना देखील मोठा धक्का बसला. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT
उसाच्या शेतात नवरीचे कपडे
हे धक्कादायक प्रकरण उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच, नवविवाहित वधूने सगळ्यांना मोठा धक्काच दिला. खरंतर, नवरी घरातून गायब होती आणि त्यावेळी घरातील मंडळींनी सूनेला शोधण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर, गावकरी सुद्धा नवरीला शोधू लागले. तिचा शोध घेत सगळे उसाच्या शेतात पोहचले आणि धक्कादायक बाब म्हणजे तिथे नवरीचे कपडे सापडले पण, ती काही सापडली नाही.
त्यावेळी गावकऱ्यांनी ड्रोन उडवला मात्र, तरीसुद्धा तिथे त्यांना कपड्यांशिवाय काहीच सापडलं नाही. अचानक घरातील सर्व दागिने आणि पैसे गायब असल्याचं आढळून आलं आणि त्यावेळी नवरीने चोरी करुन ती पळून गेल्याचं सर्वांना लक्षात आलं. गावऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या नवविवाहित वधुविरोधात तक्रार दाखल केली.
हे ही वाचा: Honeymoon झाल्यानंतर पत्नी म्हणाली - 'थांब मी येतेय', घेऊन आली दूध अन् पतीचा मूडचा बदलला; पण...
घरातील पैसे आणि दागिने गायब
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उशिरा नवरी बाहेरून खोलीचं दार लावून पळून गेली. सासरची मंडळी दुसऱ्या दिवशी लग्नाच्या रिसेप्शनची तयारी करत होती. पण सकाळी उठल्यावर कुटुंबियांनी नवरी गायब असल्याचं आढळलं. त्यानंतर तिचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यावेळी वधूचे कपडे उसाच्या शेतात सापडले. जवळपास दोन तास शेतात ड्रोन उडवून बेपत्ता नवरीचा शोध घेण्यात आला, परंतु तिचा कोणताच सुगावा हाती लागला नाही. त्यानंतर घरात ठेवलेले पैसे आणि दागिनेही गायब असल्याचं आढळून आलं. यावरून नवरी चोर असल्याचं स्पष्ट झालं.
सीसीटीव्हीमध्ये काय दिसलं?
बिलरख गावातील रहिवासी दयाराम सैनी यांनी सांगितल्याप्रमाणे, काही लोकांच्या प्रभावाखाली येऊन त्यांनी त्यांचा मुलगा राहुल सैनी याचं लग्न कानपूर शहरातील रेवना येथील मुलीशी ठरवलं. लग्न करण्यासाठी 90 हजार रुपये देण्यात आले होते. राहुलचे कुटुंब या लग्नामुळे अतिशय आनंदी होते आणि लग्नानंतर दुसऱ्या दिवशी स्वागत समारंभाची तयारी सुरू होती. मंगळवारी रात्री नवरी बाहेरून खोलीचं दार लावून पळून गेली. वधूचा शोध घेण्यासाठी ड्रोनचा सुद्धा वापर करण्यात आला. यातून काहीच हाती लागलं नाही. त्यानंतर गावात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रात्री 2 वाजताच्या सुमारास वधू एकटीच वेगाने जाताना दिसली.
हे ही वाचा: ड्रग्ज स्मगलिंग प्रकरणातील तस्कराच्या फोटोत भाजपच्या दिग्गज नेत्यांचा समावेश! मुलींचे अश्लील फोटोज..
प्रकरणातील पीडित दयाराम यांच्या म्हणण्याप्रमाणे, नवरी मंगळसूत्र, अंगठ्या, पैंजण असे 80 हजार रुपयांचे दागिने आणि लग्नासाठी ठेवलेले 50 हजार रुपये घेऊन पळून गेली. तसेच, वधूच्या पळून जाण्यामागे मध्यस्थांचा देखील हात असून लग्नाच्या आधी काही दिवस ती त्यांच्या घरी राहिली असल्याचं देखील सांगण्यात आलं. या प्रकरणाची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला.
ADVERTISEMENT
