Maharashtra Weather: कोकणात पावसाची परिस्थिती कायम, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात 'असं' असेल हवामान

Maharashtra Weather Today: राज्यातील पावसाबाबत हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. विशेष म्हणजे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता असणार आहे.

maharashtra weather

maharashtra weather

मुंबई तक

• 06:11 AM • 25 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

राज्यातील हवामान विभागाचा अंदाज

point

25 जुलै रोजी हवामान कसं असेल? घ्या जाणून

Maharashtra Weather : राज्यातील पावसाबाबत हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. विशेष म्हणजे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता असणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD)च्या माहितीनुसार, उत्तर बंगालच्या खाडीवर कमी दाबाच्या क्षेत्रफळामुळे पावसाचा अंदाज राहणार आहे. तर विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर राज्यातील एकूण मान्सूनची परिस्थिती पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात. 

हे वाचलं का?

हेही वाचा : नागपूर हादरलं! जावयाने आपल्याच सासूवर भररस्त्यात धारदार चाकूने केले सपासप वार, कारण ऐकून चक्रावून जाल

कोकण : 

कोकणात मध्यम ते जोराचा मान्सून दाखल होणार असल्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असणार आहे. वाऱ्याचा वेग 40-50 किमी/तास राहण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात अतिमुसळधार पावसाचा जोर कायम राहणार ळआहे. 

मध्य महाराष्ट्र : 

मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापूरमध्ये 25 जुलै रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असणार आहे. तसेच घाट माथ्यावरील परिसरात पावसाची तीव्रता ही अधिक असेल. 

विदर्भ : 

विदर्भात विशेषत: नागपूर आणि आसपासच्या भागात 25 जुलै रोजी पावसाचा अंदाज असणार आहे. तसेच वाऱ्याता वेग मध्यम 20-30 किमा तास राहील, तर काही ठिकाणी चक्री वारे वाहण्याची शक्यता आहे. 

मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र : 

मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी तापमान आणि हवेची गुणवत्तेबाबत विशिष्ट माहिती उपलब्ध नाही, परंतु सामान्यत: जुलै महिन्यात आर्द्रता अधिक असेल. नाशिक, जळगावसारख्या भागात मध्यम मान्सूनची शक्यता आहे. परंतु काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. 

    follow whatsapp