मुंबई: भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) आणि राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने आज (26 जुलै 2025) रोजी महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे. यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यताआहे.
ADVERTISEMENT
कोकण: अतिमुसळधार पावसाचा अंदाज
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच मुंबई, ठाणे आणि पालघर या भागांत आज जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
हे ही वाचा>> Mumbai: '40 वर्षांच्या मॅडमसोबत मुलाचे शारीरिक संबंध हे त्याच्या आई-वडिलांना माहिती होतं', समोर आली भलतीच माहिती
मुंबईत सकाळी 12.35 वाजता 4.8 मीटर उंचीची उच्च भरती अपेक्षित आहे, ज्यामुळे किनारपट्टीवरील सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. यामुळे हवामान खात्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा आणि किनारपट्टीवरील रहिवाशांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
पश्चिम महाराष्ट्र: पुण्यासह घाटमाथ्यावर रेड अलर्ट
हवामान खात्याकडून पुणे आणि सातारा येथील घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात अतिमुसळधार पाऊस अपेक्षित असून, कोल्हापूर आणि सांगली येथेही जोरदार पावसाची शक्यता आहे.
सलग कोसळणाऱ्या पावसामुळे स्थानिक प्रशासनाने धरणाच्या पाणी पातळीकडे लक्ष ठेवलं असून, पूर नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.
विदर्भ: गोंदिया आणि चंद्रपूरसाठीही रेड अलर्ट
विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसू शकतो. यामुळे येथील नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे.
मराठवाडा: मध्यम ते जोरदार पाऊस
मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे, परंतु कोकण आणि विदर्भाच्या तुलनेत पावसाचा जोर कमी असेल.औरंगाबाद, जालना आणि परभणी येथे सरींसह ढगाळ वातावरण राहील.
हे ही वाचा>> 'सहमतीने झालेले शारीरिक संबंध', विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या 40 वर्षीय शिक्षिकेबाबत कोर्टाचा मोठा निर्णय
उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस
नाशिक, जळगाव आणि धुळे येथे मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. सध्या नाशिक आणि परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने गोदावरी नदीला पूर येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
प्रशासन आणि नागरिकांसाठी सूचना
पूर नियंत्रणासाठी नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कता, धरण साठ्याचे नियोजन आणि आपत्कालीन बचाव पथकांची तयारी वाढवण्यात आली आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनचा जोर वाढला आहे.यामुळे 26 आणि 27 जुलै रोजी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
