'सहमतीने झालेले शारीरिक संबंध', विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या 40 वर्षीय शिक्षिकेबाबत कोर्टाचा मोठा निर्णय
मुंबईतील एका प्रतिष्ठित शाळेतील 40 वर्षीय शिक्षिकेला अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. आता न्यायालयाने आरोपी शिक्षिकेला जामीन मंजूर केल्याचं वृत्त समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा शिक्षिकेवर आरोप

प्रकरणासंदर्भात मुंबई कोर्टाचा मोठा निर्णय
Mumbai Crime: मुंबईतील एका प्रतिष्ठित शाळेतील 40 वर्षीय शिक्षिकेला अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. आता न्यायालयाने आरोपी शिक्षिकेला जामीन मंजूर केल्याचं वृत्त समोर आलं आहे. कोर्टाच्या मते, आरोपी शिक्षिका आणि अल्पवयीन विद्यार्थ्यामध्ये दोघांच्या संमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचं पुराव्यांवरून स्पष्ट होत आहे.
आरोपी शिक्षिकेला जामीन मंजूर
न्यायाधीशांनी सांगितल्याप्रमाणे, पीडित विद्यार्थ्याचं 17 वर्षांहून अधिक वय आहे. तसेच, आरोपी शिक्षिकेने संबंधित शाळेतून राजीनामा दिल्याने आरोपी आणि विद्यार्थ्यामध्ये कोणतेच शारीरिक संबंध नाहीत. याव्यतिरिक्त, खटला सुरू होण्यास वेळ लागणार असल्याकारणाने यादरम्यान आरोपी शिक्षिकेला तुरंगात ठेवून काहीच उपयोग होणार नसल्याचं देखील कोर्टाने सांगितलं.
न्यायालयाने अटी देखील घातल्या
पीडित विद्यार्थ्याच्या पक्षाने त्यावेळी शिक्षिकेच्या जामीनाला विरोध केला. विरोधी पक्षाच्या मते, शिक्षिकेला जामीन मिळाल्यास ती पीडित विद्यार्थ्याला धमकावून, घाबरवून त्याचा जीव धोक्यात घालू शकते. तसेच, आरोपी पुरावे सुद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न करू शकते. त्यावेळी आरोपी शिक्षिकेला कठोर अटींसह जामीन मंजूर केल्याने पीडित विद्यार्थ्याला कोणताच धोका उद्भवू शकत नसल्याचं न्यायाधीशांनी सांगितलं.
हे ही वाचा: पुण्यात खळबळ! अंबिका कला केंद्रात गोळीबार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराच्या भावाचा समावेश असल्याची चर्चा?
अटींचं उल्लंघन केल्यास जामीन रद्द
आरोपी शिक्षिकेचा जामीन मंजूर करतेवेळी न्यायाधीशांनी काही अटी घातल्या. आरोपी कोणत्याही पद्धतीने पीडित विद्यार्थ्याला भेटणार नाही तसेच त्याला धमकावणार नसल्याची अट घालण्यात आली. ती साक्षीदारांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भेटणार नाही किंवा त्यांना कोणतंच आश्वासन सुद्धा देणार नसल्यांचं न्यायाधीशांनी सांगितलं. आरोपी शिक्षिकेने अटींचं उल्लंघन केल्यास तिचा जामीन त्वरीत रद्द करण्यात येणार असल्याचं देखील सांगण्यात आलं.
शिक्षिकेच्या वकीलांचा युक्तिवाद
आरोपी शिक्षिकेच्या वकीलांनी युक्तीवाद करत म्हटलं की शिक्षिकेला खोट्या आरोपाखाली प्रकरणात अडकवण्यात आलं. तसेच, केवळ मराठीमध्ये अटकेचं कारण दिलं असून शिक्षिकेला ही भाषा समजत नाही. त्यामुळे भाषेचं अनुवाद देखील करण्यात आला नसल्याचा आरोप करण्यात आला. आरोपी शिक्षिकेला त्यावर फक्त सही करण्याचं सांगण्यात आलं होतं. अशा प्रकारे शिक्षिकेची फसवणूक केल्याचं वकीलांनी सांगितलं.
हे ही वाचा: कल्याण: 'आधी तिने माझ्या सुनेच्या कानाखाली मारली, नंतर..', मराठी तरूणीच्या मारहाणीचा नवा VIDEO आला समोर!
कोर्टाने या सगळ्याचा विचार करून आरोपी शिक्षिकेला जामीन मंजूर केला. तसेच, अटींचं उल्लंघन केल्यास शिक्षिकेचा जामीन रद्द करण्यात येणार असल्याचं देखील न्यायाधीशांनी सांगितलं. तसेच, पीडित विद्यार्थी अल्पयीन असून त्याला मानसिक त्रास झाला असल्याचा कोर्टाने विचार केला. मात्र, शिक्षिकेने शाळेतून राजीनामा दिला असून तिचा विद्यार्थ्यावर कोणत्याच प्रकारचा प्रभाव नसल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं.