Govt Job Recruitment: बरेच तरुण सरकारी नोकरीसाठी प्रयत्नात असल्याचं आपण पाहतो. त्यासाठी ते वेगवेगळ्या माध्यमातून नोकरीच्या भरतीसंदर्भात माहिती मिळवत असतात. अशा विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आम्ही घेऊन आलो आहोत. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) ने हेड कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) च्या एकूण 403 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया ही 18 मे 2025 पासून सुरू झाली असून या नोकरीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 6 जून 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
ADVERTISEMENT
काय आहे पात्रता?
या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी उत्तीर्णचं प्रमाणपत्र असणं अनिवार्य आहे. यासोबतच, खेळ आणि अॅथलेटिक्समध्ये राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग घेण्याचा अनुभव असणं गरजेचं आहे. उमेदवारांना असा सल्ला दिला जात आहे की त्यांनी या भरतीसाठीची पात्रता आणि योग्यतेसंदर्भातील माहिती CISF च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन नक्की तपासावी.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी 18 वर्षे ते 23 वर्षे वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. तसेच, वयाची गणना 1 ऑगस्ट 2025 च्या आधारे केली जाईल. यामध्ये आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांर्तगत वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
हे ही वाचा: 'मी लवकरच येईल..Love You कुश मुश', ज्योती मल्होत्राने टाकला 'लेटरबॉम्ब', पोलिसांना सापडली खतरनाक डायरी
अर्ज करण्यासाठी शुल्क
जनरल (Open), EWS आणि ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल. तसेच, एससी (SC), एसटी (ST) आणि सर्व महिला उमेदवारांना कोणतंच शुल्क भरावं लागणार नाही. तसेच, उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून शुल्क भरता येईल.
कशी होणार निवड?
उमेदवारांची निवड दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिला टप्पा ट्रायल टेस्ट, नंतर प्रोफिशिएन्सी टेस्ट, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट (PST) आणि शेवटी डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच दस्तऐवजांची तपासणी केली जाईल.
यानंतर, दुसऱ्या टप्प्यात मेडिकल टेस्ट आयोजित केली जाईल. या सर्व टप्प्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश अंतिम मेरिट लिस्टमध्ये केला जाईल.
हे ही वाचा: Pune Crime : शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाच्या गाडीवर गोळीबार, बुलेट कारची काच तोडून...
कसं कराल अप्लाय?
या भरतीसाठी इच्छुक उमेदवार cisfrectt.cisf.gov.in या CISF च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरू शकतात. अर्ज भरतेवेळी सर्व आवश्यक डॉक्यूमेंट्स अपलोड करणं आणि नियमानुसार, शुल्क भरणं अनिवार्य आहे. अर्ज भरून झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून ती सुरक्षितरित्या ठेवा.
ADVERTISEMENT
