मुंबई: हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अशात मुंबईत कोरोना संशयित दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक बातमी आता समोर आली आहे. कोरोना सदृश्य रुग्ण आढळल्याने मुंबईकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मात्र, या दोन रुग्णांचा मृत्यू खरंच कोरोनामुळं झाला आहे का? पुन्हा कोरोनानं एन्ट्री केली आहे का? हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
मुंबईतील दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू?
मुंबईतील काही रुग्णांमध्ये कोविड सदृश्य लक्षणे आढळण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईच्या केईएम रुग्णालयामध्ये कोविडसदृश्य लक्षण असणाऱ्या दहा रुग्णांची नोंद झाली आहे. कर्करोगाने ग्रस्त 59 वर्षीय महिला आणि मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त 14 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या दोन्ही रुग्णांची मरणोत्तर कोविड-19 चाचणी करण्यात आली होती. जी पॉझिटिव्ह आली आहे.
हे ही वाचा>> मुंबईत पुन्हा 26/11 होण्याची वाट पाहणार का? CSMT रेल्वे स्थानकात तर... हादरवून टाकणारं सत्य समोर!
मात्र, केईएम रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, 14 वर्षीय रुग्णाला नेफ्रोटिक सिंड्रोम होता आणि त्याचं मृत्यू मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे झालं. तर दुसऱ्या रुग्णाला कॅन्सर होता. हे दोन्ही रुग्ण कोमॉरबिड होते, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
दरम्यान, दक्षतेचा उपाय म्हणून मुंबई महापालिका आणि आरोग्य विभागाने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे. सध्या घाबरण्याची गरज नाही असे तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र, निष्काळजीपणा करू नये विशेष करुन वृद्ध, गंभीर आजारांनी ग्रस्त असलेले लोक आणि परदेशातून परतणाऱ्या प्रवाशांनी काळजी घ्यावी, असं डॉक्टर सांगत आहेत.
हे ही वाचा>> Govt Job: महाराष्ट्रातील ऑर्डनन्स फॅक्टरीत मोठी भरती, मराठी तरुणांनो ही संधी अजिबात सोडू नका!
मिळालेल्या माहितीनुसार, केईएम रुग्णालयात गेल्या दोन महिन्यांत 15 कोविड-19 रुग्णांची नोंद झाली आहे. हे सर्व सौम्य आणि फ्लूसारखे आहेत. सर्व रुग्ण गुंतागुंतीशिवाय बरे झाले आहेत.
ADVERTISEMENT
