Govt Job: महाराष्ट्रातील ऑर्डनन्स फॅक्टरीत मोठी भरती, मराठी तरुणांनो ही संधी अजिबात सोडू नका!

मुंबई तक

ऑर्डनन्स फॅक्टरीकडून AOCP ट्रेडमध्ये DBW (Danger Building Worker) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदासाठी उमेदवारांची निवड कंत्राटी पद्धतीने केली जाईल.

ADVERTISEMENT

ऑर्डनन्स फॅक्टरीकडून AOCP ट्रेडमध्ये DBW (Danger Building Worker) पदासाठी भरती जाहीर
ऑर्डनन्स फॅक्टरीकडून AOCP ट्रेडमध्ये DBW (Danger Building Worker) पदासाठी भरती जाहीर
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऑर्डनन्स फॅक्टरीत मोठी भरती

point

ऑर्डनन्स फॅक्टरीत DBW पदासाठी भरती जाहीर

point

काय आहे पात्रता आणि अर्जाची शेवटची तारीख

Ordinance Factory Recruitment: म्युनिशन्स इंडिया लिमिटेडचं युनिट असलेल्या ऑर्डनन्स फॅक्टरीकडून AOCP ट्रेडमध्ये DBW (Danger Building Worker) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदासाठी उमेदवारांची निवड कंत्राटी पद्धतीने केली जाईल. याचा सुरुवातीचा कालावधी 1 वर्षाचा असेल आणि आवश्यकतेनुसार तो जास्तीत जास्त 4 वर्षांपर्यंत वाढवता येईल. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार 31 मे 2025 पर्यंत पोस्टाद्वारे अर्ज करू शकतात.

पदाचं नाव आणि वेतन

  • DBW (AOCP ट्रेड)- कार्यकाळाच्या आधारावर
  • 125 पदभरती 
  • वेतन: 19,900 रुपये + महागाई भत्ता 

जात प्रवर्गानुसार रिक्त जागा

  • जनरल (UR)- 57 पदे
  • ओबीसी (NCL)- 33 पदे
  • अनुसूचित जाति (SC)- 12 पदे
  • अनुसूचित जनजाति (ST)- 11 पदे
  • EWS- 12 पदे
  • माजी सैनिक (Ex-SM)- 12 पदे 

वयोमर्यादा

या भरतीमध्ये, जनरल (UR) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 40 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे, जी 31 मे 2025 तारखेला अनुसरुन असेल.तसेच, राखीव प्रवर्गांना नियमांनुसार सवलत दिली जाईल. एससी (SC)/एसटी (ST) प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षांची सूट, ओबीसी (NCL) यांना 3 वर्षांची सूट आणि माजी सैनिकांना त्यांच्या सेवा कालावधीसह 3 वर्षांची सूट मिळेल.

हे ही वाचा: Video : डोळ्यादेखत भुईमूग वाहून गेला! वाशिमच्या शेतकऱ्याची धडपड पाहून केंद्रीय कृषीमंत्र्यांनी थेट फोन केला आणि...

कसा कराल अर्ज?

अर्ज प्रक्रियेअंतर्गत, इच्छुक उमेदवारांनी पोस्टाद्वारे ऑफलाइन अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. ज्या लिफाफ्यात अर्ज पाठवला जाईल त्यावर "Application for DBW personnel of AOCP trade on Tenure basis" असे स्पष्टपणे लिहिलेले असणे आवश्यक आहे. अर्ज 31 मे 2025 पर्यंत संबंधित पत्त्यावर पोहोचणे अनिवार्य आहे. सविस्तर माहिती आणि अर्जाशी संबंधित माहितीसाठी, उमेदवार https://munitionsindia.in/career/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन जाहिरात वाचू शकतात.

हे ही वाचा: मुंबईत पुन्हा 26/11 होण्याची वाट पाहणार का? CSMT रेल्वे स्थानकात तर... हादरवून टाकणारं सत्य समोर!

हे वाचलं का?

    follow whatsapp