Video : डोळ्यादेखत भुईमूग वाहून गेला! वाशिमच्या शेतकऱ्याची धडपड पाहून केंद्रीय कृषीमंत्र्यांनी थेट फोन केला आणि...

मुंबई तक

Washim Farmer Viral Video : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाल्याचं समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

Washim Farmer Groundnut Viral Video
Washim Farmer Groundnut Viral Video
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वाशिमच्या शेतकऱ्याच्या अश्रूंचा बांध फुटला

point

डोळ्यादेखत पावसाच्या पाण्यात भुईमूग वाहून गेला

point

केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शेतकऱ्याला थेट फोन केला आणि...

Washim Farmer Viral Video : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. वाशिमच्या शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत पावसाच्या पाण्यात भुईमूग वाहून गेला. वाहून जाणारा भुईमूग गोळा करण्यासाठी शेतकऱ्याने खूप धडपड केली. शेतकऱ्याचा हा हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यानंतर केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी थेट शेतकऱ्याला फोन केला. गौरव उर्फ इंदल पवार असं या शेतकऱ्याचं नाव आहे. चौहान यांनी शेतकऱ्याला नुकसान भरपाईचं आश्वासन दिलं आणि आवश्यक ती मदत महाराष्ट्र सरकारकडून केली जाईल, असंही ते म्हणाले.

शिवराजसिंह चौहान यांनी एक्सवर शेअर केला तो व्हिडीओ

वाशिमचे शेतकरी गौरव पवार हे शेतातील भुईमूग बाजारात विकण्यासाठी घेऊन आले होते. तेव्हा अचानक पाऊस सुरू झाला. शेतात काबाडकष्ट करून पीकवलेलं भुईमूग डोळ्यादेखत वाहून गेल्यानं शेतकरी हवालदिल झाला होता. पावसाच्या पाण्यात वाहून जाणारं भुईमूग गोळ्या करण्यासाठी शेतकऱ्याने केविलवाणी धडपड केली.

हे ही वाचा >> RSS हेडक्वॉर्टरवरील हल्ल्याच्या मास्टरमाइंडला 'अज्ञात हल्लेखोराने' पाकिस्तानात संपवलं, काय आहे Inside स्टोरी?

शेतकऱ्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शेतकरी पवार यांनी थेट फोन केला. चौहान यांनी शेतकऱ्यांना पीकाच्या नुकसान भरपाईचं आश्वासन दिलं. केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले, "व्हिडीओ पाहून मला खूप दु:ख झालं. पण चिंता करू नका. महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांप्रति खूप संवेदनशील आहे.

मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या कृषीमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांसोबतही चर्चा केली आहे. जे काही नुकसान झालं आहे, त्याची भरपाई दिली जाईल, जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला कोणतीही समस्या निर्माण होणार नाही. सोमवारपर्यंत नुकसान भरपाई मिळेल, याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत". 

हे ही वाचा >> मुंबईत पुन्हा 26/11 होण्याची वाट पाहणार का? CSMT रेल्वे स्थानकात तर... हादरवून टाकणारं सत्य समोर!


 

हे वाचलं का?

    follow whatsapp