ज्योती मल्होत्राबाबत पाकिस्तानी लोकांनी Google वर काय काय केलं सर्च? धक्कादायक माहिती आली समोर

Jyoti Malhotra Latest Update :  हेरगिरीच्या आरोपाखाली अटक झालेल्या ज्योती मल्होत्राबाबत फक्त भारतातच नाही, तर पाकिस्तानमध्येही तुफान चर्चा रंगली आहे.

Jyoti Malhotra Latest News Update

Jyoti Malhotra Latest News Update

मुंबई तक

19 May 2025 (अपडेटेड: 19 May 2025, 06:33 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

ज्योती मल्होत्राबाबत सर्वात मोठी अपडेट आली समोर

point

पाकिस्तानी लोकांनी ज्योती मल्होत्राबाबत काय काय केलं सर्च?

point

ज्योतीचा मोबाईल, लॅपटॉप फॉरेन्सिक विभागाकडे पाठवला

Jyoti Malhotra Latest Update :  हेरगिरीच्या आरोपाखाली अटक झालेल्या ज्योती मल्होत्राबाबत फक्त भारतातच नाही, तर पाकिस्तानमध्येही तुफान चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या गुगल ट्रेंड्सवर ज्योती मल्होत्रा सर्वात जास्त सर्च केलेल्या व्यक्तींमध्ये सामील झाली आहे. तपास यंत्रणांनी यूट्यूबर ज्योती मल्होत्राची लक्झरी लाईफस्टाईल, परदेशी दौरे आणि फंडिंगबाबतही चौकशी सुरु केली आहे. परंतु, तपासादरम्यान ज्योती कोणताही प्रतिसाद देत नसल्याचं समजते. ती बाली, इंडोनेशियाच्या ट्रिपलाही गेली होती. पोलिसांनी तिच्याकडून जप्त केलेले मोबाईल, लॅपटॉप आणि अन्य इलेक्ट्रॉनिक डिवाईस फॉरेन्सिक विभागाकडे पाठवले आहेत. 

हे वाचलं का?

ज्योती मल्होत्राबाबत पाकिस्तानी लोकांनी काय सर्च केलं?

या घटनेनंतर ज्योती मल्होत्राचं नाव अचानक चर्चेत आलं. पाकिस्तानमध्ये लोक तिच्याबाबत माहिती गोळा करत आहेत. तेथील गुगल सर्चमध्ये 'ज्योती मल्होत्रा कोण आहे?' असा प्रश्न सर्वात जास्त वेळा विचारला गेला आहे. 'तिचं यूट्यूब चॅनल आहे का?', 'तिचा धर्म काय आहे?', असे अनेक प्रश्न पाकिस्तानी लोक गुगलला सर्च करत आहेत. पाकिस्तानी ट्वीटर आणि इन्स्टाग्रामवर ज्योती मल्होत्राशी जोडले गेलेल्या पोस्ट, मीम्स सतत समोर येत आहेत. 

हे ही वाचा >> मोठी बातमी! विधानभवनाच्या गेटला आग, आगीचं कारण आलं समोर

गूगलवर सर्वात जास्त ट्रेंड करणाऱ्या किवर्ड्समध्ये Jyoti Malhotra YouTube Channel, who is Jyoti malhota, Jyoti Malhotra religion ट्रेंड करत आहेत. पाकिस्तानचे सोशल मीडिया यूजर्स फक्त तिचे व्हिडीओच पाहत नाहीत, तर तिने बनवलेला कंटेट पाहण्याचीही त्यांना उत्सुकता लागली आहे.

तसच तिने बनवलेला कंटेट कोणत्या गुप्तहेक एजन्सीसोबत जोडला गेला आहे, याचाही ते शोध घेत आहेत. भारतीय तपास यंत्रणांनी हे प्रकरण खूप गंभीरतेनं घेतलं आहे. प्राथमिक तपासात समोर आलं आहे की, ज्योती मल्होत्रा आंतरराष्ट्रीय संपर्कात होती आणि अनेकदा पाकिस्तानात गेली होती. याबाबत अजूनही तपास सुरु आहे. 

हे ही वाचा >> मुंबईत पुन्हा 26/11 होण्याची वाट पाहणार का? CSMT रेल्वे स्थानकात तर... हादरवून टाकणारं सत्य समोर!

    follow whatsapp