Ola Employee Viral News : ओला कंपनीची (OLA) आर्टिफिशियल इंटेलिजेंस इकाई क्रुट्रिम (Ola krutrim) खूप चर्चेत आहे. एका सोशल मीडिया पोस्टने दावा केला आहे की, ओला क्रूट्रिमचा एक कर्मचारी निखिल सोमवंशीने टॉक्सिक वर्क कल्चर आणि वाढत्या कामाच्या दबावामुळे स्वत:चं जीवन संपवलं आहे. या घटनेनंतर ओलाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर जोरदार टीका केली जात आहे. ओलाच्या एका कर्मचाऱ्याने सोशल मीडिया पोस्टवर दावा केला आहे की, त्याच्यासोबत काम करणारा त्याचा मित्र निखिल समोवंशीने टॉक्सिक वर्क कल्चर आणि अतिरिक्त कामाच्या प्रेशरमुळे स्वत:चं आयुष्य संपवलं.
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
मिळालेल्या माहितीनुसार, 8 मे रोजी बंगळुरुच्या अगरा झीलमध्ये निखिल सोमवंशीचा मृतदेह सापडला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेसंबंधित एक रेडिट पोस्ट खूप व्हायरल झाली आहे. यामध्ये ओला कंपनीच्या जीवन संपवलेल्या इंजिनिअरबाबत म्हटलंय की, मला माहित नाही की हे आतापर्यंत सार्वजनिक मुद्दा का नाहीय.
हे ही वाचा >> Mumbai COVID-19 Death: मुंबईत पुन्हा कोरोना आला.. दोघांचा मृत्यू? खरं काय ते समजून घ्या!
माझ्या एका सहकारी कर्मचाऱ्याने कामाच्या तणावामुळे स्वत:चं जीवन संपवलं आहे. तो ओला क्रूट्रिम टीमध्ये काम करत होता आणि दोन अन्य लोकांसोबत एका प्रोजेक्टला लीड करत होता. इतर दोघांनी कंपनी सोडली होती. म्हणून तो त्यांच्या कामाविषयी नाराज होता. मी नाव नाही घेतलं पाहिजे, पण मॅनेजर राज किरणला अजिबात माहित नाही की, लोकांना कसं मॅनेज केलं जातं.
बॉसच्या चुकीच्या वागणुकीमुळे जीवन संपवलं
पोस्टमध्ये पुढे सांगण्यात आलं आहे की, मॅनेजर राज किरण फक्त कॉल अटेंड करतो. लोकांना फसवतो आणि गायब होतो. कारण तो अमेरिकेत राहतो आणि जास्तीत जास्त कर्मचारी इथे बंगळुरुत आहेत. मीटिंगमध्ये वापरण्यात आलेले शब्द वेदनादायी आहेत. विशेषत: नवीन लोकांच्या विरोधात..ते फक्त लोकांवर त्यांचा राग काढत आहेत.
हे ही वाचा >> अरे बापरे पुन्हा कोरोना आला, दोन देशांनी जगाचं टेन्शन वाढवलं; आता तर मुंबईतही..
या घटनेनंतरही तेथील लोकांच्या व्यवहारात बदल झालेला नाही. पोस्टमध्ये हा सुद्धा आरोप लावण्यात आला आहे की, अधिकारी ही घटना दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. हे निंदनीय आहे. या घटनेबाबत पोलीस कठोर कारवाई करतील, अशी अपेक्षा आहे..
ADVERTISEMENT
