अरे बापरे पुन्हा कोरोना आला, दोन देशांनी जगाचं टेन्शन वाढवलं; आता तर मुंबईतही..
Corona Latest News Update : कोव्हिड-19 ने पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं समोर आलं आहे. हाँगकाँगमध्ये मागील दहा आठवड्यापासून 30 टक्के रुग्ण वाढत आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

या देशात कोरोना रुग्ण वेगाने वाढले

कोरोना रुग्णांची संख्या का वाढतेय?

भारतातही आढळले कोरोना रुग्ण, जाणून घ्या रिपोर्ट
Corona Latest News Update : कोव्हिड-19 ने पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं समोर आलं आहे. हाँगकाँगमध्ये मागील दहा आठवड्यापासून 30 टक्के रुग्ण वाढत आहेत. पण कोरोना रुग्णांची वाढती संख्या फक्त हाँगकाँमध्येच नाही, तर सिंगापूरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. सिंगापूरमध्येही एका आठवड्यात 30 टक्के रुग्ण वाढले आहेत. चीन आणि थायलँडमध्येही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर भारतातही कोरोनाच्या 58 रुग्णांची नोंद झाल्याची माहिती समोर आलीय. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या कोविड डॅशबोर्डने याबाबत माहिती दिली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 93 असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईच्या केईएम रुग्णालयामध्ये कोविडसदृश्य लक्षण असणाऱ्या दहा रुग्णांची नोंद झाली आहे. कर्करोगाने ग्रस्त 59 वर्षीय महिला आणि मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त 14 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.
हाँगकाँगमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण
हाँगकाँगमध्ये 10 मे 2025 रोजी संपलेल्या आठवड्यात 1024 कोव्हिड केस रिपोर्ट केले गेले. त्याआधी मागील आठवड्यात 972 कोरोनाचे रुग्ण आढळले होते. मार्चच्या सुरुवातीला एका आठवड्यात कोरोनाचे फक्त 33 रुग्ण होते. म्हणजेच मार्च महिन्यापासून रुग्णांमध्ये वाढ होत आहे. सर्वात काळजीपूर्वक बाब म्हणजे इथे पॉजिटिव्हिटी रेड सतत वाढत आहे.
हे ही वाचा >> ज्योती मल्होत्राबाबत पाकिस्तानी लोकांनी Google वर काय काय केलं सर्च? धक्कादायक माहिती आली समोर
1 मार्चला संपलेल्या आठवड्यात पॉजिटिव्हिटी रेट फक्त 0.31 टक्के होता. 5 एप्रिलपर्यंत 5.09 टक्के झाला होता. तर 10 मे रोजी संपलेल्या आठवड्यात हा आकडा वाढून 13.66 टक्क्यापर्यंत पोहोचला. हाँगकाँगच्या सरकारकडून नागरिकांना स्पष्ट सांगण्यात आलं आहे की, सर्व लोकांनी स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी स्वत:च्या आणि आजबाजूच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी. जेणेकरून स्वत:चं आणि इतरांचा कोरोनापासून बचाव होईल.
मुंबईत काय परिस्थिती?
मुंबईतील काही रुग्णांमध्ये कोविड सदृश्य लक्षणे आढळण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईच्या केईएम रुग्णालयामध्ये कोविडसदृश्य लक्षण असणाऱ्या दहा रुग्णांची नोंद झाली आहे. कर्करोगाने ग्रस्त 59 वर्षीय महिला आणि मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त 14 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या दोन्ही रुग्णांची मरणोत्तर कोविड-19 चाचणी करण्यात आली होती. जी पॉझिटिव्ह आली आहे.
बूस्टर घेतला असेल, तरी घ्यावी लागेल व्हॅक्सीन
ज्या नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे आणि ज्यांना आधीपासून आजार आहे, अशा नागरिकांना हाँगकाँग सरकारने महत्त्वाचा सल्ला दिला आहे. मागील डोस आणि संसर्ग झाल्यानंतरच्या सहा महिन्यानंतर कोव्हिड वॅक्सीन घ्या. जरी त्यांनी यापूर्वी कितीही डोस घेतले असतील, तरी नवीन डोस घेण्याची गरज आहे.
हे ही वाचा >> Beed Crime : शिवराज शिवटेला मारहाण, सुरेश धस कडाडत म्हणाले 'त्या मुलांना तर...'
आशियातील देशात कोरोना रुग्ण कसे वाढले?
सिंगापूरमध्ये 27 एप्रिलला संपलेल्या आठवड्यात 11,100 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. या रुग्णांमध्ये वाढ होऊन ते 3 मे च्या आठवड्यात 14200 केसेस झाल्या. म्हणजे एका आठवड्यात जवळपास 30 टक्क्यांनी वाढ झाली.