Kartiki Ekadashi: मराठा समाजाचा विरोध मावळला, ‘हे’ उपमुख्यमंत्री करणार विठ्ठलाची महापूजा

Kartiki Ekadashi Maratha Community: सकल मराठा समाजाच्या काही मागण्या मान्य केल्यानंतर मराठा समाजाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कार्तिकी एकादशीच्या महापुजेला असलेला आपला विरोध मागे घेतला आहे.

opposition of maratha community subsided dcm devendra fadnavis will come to pandharpur and perform kartiki ekadashi official grand puja of vitthala

opposition of maratha community subsided dcm devendra fadnavis will come to pandharpur and perform kartiki ekadashi official grand puja of vitthala

मुंबई तक

21 Nov 2023 (अपडेटेड: 21 Nov 2023, 03:23 PM)

follow google news

Kartiki Ekadashi Mahapuja Devendra Fadnavis: नितीन शिंदे, पंढरपूर: आरक्षणाच्या मुद्द्यावरून कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) दिवशी होणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या पूजेस मराठा समाजाने (Maratha Samaj) विरोध केला होता. त्यामुळे कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा नेमकी कोणी करायची यावरून मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र आता याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. ज्यामुळे सरकारचीही चिंता मिटली आहे. कारण मराठा समाजाने उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पुजेला केलेला विरोध आता मावळला आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय महापुजेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. (opposition of maratha community subsided dcm devendra fadnavis will come to pandharpur and perform kartiki ekadashi official grand puja of vitthala)

हे वाचलं का?

सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मराठा आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी मराठा आंदोलकांनी आरक्षणासह पाच मागण्या जिल्हाधिकाऱ्यांपुढे ठेवल्या होत्या. सर्व मागण्या आता जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केल्या असून उपमुख्यमंत्री मराठा आंदोलन आता तीस मिनिटे चर्चेसाठी वेळ देणार आहेत.

हे ही वाचा >> ‘होय माझ्या पाठीशी मोठी शक्ती’, जरांगे-पाटलांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर

या मागणीनंतर मराठा समाजाने आता उपमुख्यमंत्र्यांचं पूजेसाठी आम्ही स्वागत करू.. अशी भूमिका जाहीर केली. त्यामुळे पंढरपुरात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते महापूजा होणार आहे. महापूजेला होणार विरोध आता शमला असून आता पूजा निश्चितच होणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगितले जात आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपुरात विठ्ठलाची शासकीय महापूजा

मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस हे विठ्ठलाची शासकीय महापूजा करणार आहेत. कार्तिकीच्या शासकीय महापुजेसाठी आता देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झालं आहे.

कार्तिकी एकादशी ही 23 नोव्हेंबर रोजी आहे. त्यामुळे या दिवशी पहाटेच ही पूजा सुरू होणार आहे. त्यासाठी बुधवारी (22 नोव्हेंबर) देवेंद्र फडणवीस हे पंढरपुरात दाखल होणार आहेत. त्यानंतर गुरुवारी पहाटे अडीच वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापुजेला सुरुवात होणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे.

हे ही वाचा >> जालन्यात धनगर मोर्चाला हिंसक वळण! दगडफेक, वाहनांची तोडफोड; नेमकं काय घडलं?

दरम्यान, मराठा समाजाने उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या महापुजेला केलेला विरोध मावळल्यानंतर भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी पंढरपूर मधील सकल मराठा समाजाने घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केलं आहे.

मुख्यमंत्र्यांचे आवाहन

दरम्यान, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मराठा समाजाला आवाहन केले होते. याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, ‘आषाढी आणि कार्तिकी एकादशी ही महाराष्ट्राची समृध्द परंपरा आहे. विठ्ठलाच्या ओढीने लाखो भाविक आषाढीप्रमाणे कार्तिकी एकादशीलाही दर्शनासाठी पंढरपूरला येत असतात. कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचा मान राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे त्या पूजेला विरोध करण्याची किंवा त्यात अडथळा निर्माण करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही. एकादशीच्या धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात विरोधाचा सूर लावणे योग्य नाही. त्यामुळे या परंपरेमध्ये खंड पाडण्याचा, अडथळे आणण्याचा प्रयत्न करू नये. एकादशीला महाराष्ट्रात विठ्ठलनामाचाच गजर व्हायला हवा. सारा परिसर जयघोषाने दुमदुमुदे.’ असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

    follow whatsapp