Palghar crime : पालघर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका अल्पवयीन मुलीची इंस्टाग्रामवर एका अज्ञात मुलीशी ओळख झाली. नंतर त्या दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर त्यांचे मैत्रीचे रुपांतर हे नात्यात झालं. हे प्रकरण इथवर न थांबता पुढे वाढले, त्यानंतर हे प्रकरण ब्लॅकमेलपर्यंत पोहोचल्याचं सांगण्यात येत आहे. अशातच मुलींचे अश्लील फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. या प्रकरणात पोलीस शोध घेत असल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, 'विलासरावांच्या...'
नेमकं काय घडलं?
पालघरमधील वालीव येथील रहिवासी असलेल्या पीडितेची सोशल मिडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामद्वारे आरोपीशी मैत्री झाली होती. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर हे नात्यात झाले. याच प्रकरणा दरम्यान पीडिता ही आरोपीसोबत मध्य प्रदेशात निघून गेली होती. पीडित मुलगी ही फेब्रुवारी ते सप्टेंबर 2025 रोजी आरोपीसोबत राहिली होती, त्याच काळात तिचा छळ आणि लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
आरोपीकडून अल्पवयीन मुलीवर छळ करत 'तसले' फोटो सोशल मीडियावर केले शेअर
पीडित मुलगी ही आरोपीच्या घरातून पळून जाण्यात यशस्वी ठरली आणि सप्टेंबर महिन्यात तिच्या पालकांच्या घरी परतली. आरोपीने पीडितेला बदनाम करण्यासाठी आणि तिला परत आपल्याकडे येण्यास भाग पाडण्यासाठी सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह फोटो पोस्ट करण्यास सुरुवात केली, ज्यात तिच्या अश्लील फोटोंचा समावेश होतो, असे पीडितेनं सांगितलं. या प्रकरणी आरोपीवर गेल्या वर्षी फेब्रुवारीत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्त होतं.
हे ही वाचा : आज बुधवारचा दिवस काही राशींसाठी भाग्यशाली, लवकरच मिळेल शुभवार्ता, फक्त 'हे' करावं लागेल
पीडितेच्या बहिणीने केलेल्या काही तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी 28 डिसेंबर रोजी आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 64 आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.
ADVERTISEMENT











