आज बुधवारचा दिवस काही राशींसाठी भाग्यशाली, लवकरच मिळेल शुभवार्ता, फक्त 'हे' करावं लागेल
Astrology : 7 जानेवारी 2025 रोजीचे राशीभविष्य हे पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT

1/5
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीमुळे काही राशींना लाभदायक योग निर्माण होत आहेत. गुरू ग्रहा हा मिथुन राशीत, सूर्य, बुध, शुक्र आणि मंगळ ग्रह हा धनु राशीत, तर राहू कुंभ राशीत तर शनी मीन राशीत गोचर करत आहेत. या स्थितीमुळे काही राशींना आरोग्य, व्यवसाय आणि प्रेमात उतार-चढाव अनुभवता येऊ शकतात.

2/5
मेष राशी :
मेष राशीतील महत्त्वपूर्ण निर्णय थांबवून ठेवा. भावुकतेत निर्णय घेतल्यास नुकसान होऊ शकते. आरोग्य ठीक, प्रेम आणि संतान स्थिती मध्यम, व्यवसाय चांगला आहे. सूर्याला जल अर्पण करणे शुभ राहील.

3/5
वृश्चिक राशी :
वृश्चिक राशीतील लोकांना व्यवसायात चढ-उताराला सामोरं जावं लागणार आहे. कोर्ट-कचेरीपासून दूर राहा. आपल्या आरोग्यावर लक्ष द्यावं. प्रेम आणि संतान स्थिती ठीक आहे.

4/5
कुंभ राशी :
कुंभ राशीतील लोकांनी आपल्या जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि नात्यावर लक्ष ठेवावं. प्रेम आणि संतान स्थिती चांगली असणार आहे. व्यवसाय चांगला असून नोकरीत कसलीही जोखीम घेऊ नका आणि आरोग्यावर लक्ष द्यावं.

5/5
वृषभ राशी :
घरगुती कलह निर्माण होण्याची मोठी चिन्हे आहेत. घरातील काही बाबी शांतपणे हाताळा, अन्यथा लोकांच्या चव्हाट्यावर येऊ शकतात. प्रेम आणि संतान स्थिती मध्यम असेल. व्यवसाय चांगला सुरु असेल.












