पंढरपुरात भीमा नदीला पूर, मंदिरात पूजेसाठी गेलेले साधू अडकलेले, बचावकार्य सुरू

नीरा नदीतून सध्या 30,000 क्युसेसचा विसर्ग भीमा नदीच्या पात्रात येत आहे. यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

26 May 2025 (अपडेटेड: 26 May 2025, 12:01 PM)

follow google news

Pandharpur Weather Update : राज्यात पावसाची तुफान बॅटींग सुरू झाली आहे. पंढरपुरातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.  दमदार पावसामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे. या पुरामुळे पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे गावातील महादेव मंदिरात पूजेसाठी गेलेले तीन साधू अडकले आहेत. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Monsoon Update : राज्यभरात पावसाचा कहर, 'या' सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

नदीत साधू अडकल्याची माहिती मिळताच, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची टीम गुरसाळे गावात पोहोचली. अडकलेल्या साधूंना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने, हे साधू सुखरूप असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ, पूर परिस्थिती निर्माण

नीरा नदीतून सध्या 30,000 क्युसेसचा विसर्ग भीमा नदीच्या पात्रात येत आहे. यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून, नदी काठच्या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. 

हे ही वाचा >> पोट दुखतं म्हणून मुलीला दवाखान्यात नेलं, गरोदर असल्याचं कळलं! नराधम पित्यानेच...

पंढरपूर येथील ऐतिहासिक ब्रिटिश कालीन पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. तसेच, नदीपात्रातील प्रसिद्ध पुंडलिक मंदिरासह अनेक छोटी-मोठी मंदिरे पाण्याने वेढली गेली आहेत. यामुळे स्थानिक भाविक आणि पर्यटकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

    follow whatsapp