पोट दुखतं म्हणून मुलीला दवाखान्यात नेलं, गरोदर असल्याचं कळलं! नराधम पित्यानेच...
दरम्यान, या घटनेनंतर पीडित मुलीच्या फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. नराधम पित्याविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

हिंगोलीमध्ये संतापजनक घटना!

जन्मदात्या बापानेच केला लेकीवर अत्याचार
Hingoli Crime News : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात घडलेल्या घटनेनं जिल्हा हादरला आहे. आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीत एक संतापजनक घटना समोर आली. एका नराधम पित्यानं आपल्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवरच अत्याचार केल्याचा चीड आणणारा प्रकार समोर आलाय. पत्नी अंध असल्याचा गैरफायदा घेत, या पित्याने हे घृणास्पद कृत्य केलं. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानं हा प्रकार उघड झाला.
हे ही वाचा >> पुण्यात खळबळ! आईसह पोटच्या लेकरांची केली निर्घृण हत्या! नंतर पेट्रोल टाकून जाळलं, पण नंतर...
सहावीत शिकणारी ही मुलगी गेल्या डिसेंबर महिन्यात या अमानुष अत्याचाराला बळी पडली होती. काही दिवसांपासून तिला पोटदुखीचा त्रास जाणवत होता. यामुळे तिला नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तपासणीदरम्यान ती गर्भवती असल्याचं समोर आलं, त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली.
हे ही वाचा >> Pune Crime : 'पांढऱ्या पायाची, जा तुझ्याबापाकडून कार...' वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर हुंडाबळीचं आणखी एक प्रकरण समोर
दरम्यान, या घटनेनंतर पीडित मुलीच्या फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. नराधम पित्याविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, या प्रकरणाने संपूर्ण परिसरात संताप आणि उद्विग्नता पसरली आहे.