परभणी हादरलं! विवाहित महिलेच्या प्रेमात वेडा झाला तरुण, लग्न करण्याचा धरला हट्ट, कुटुंबियांनी विरोध केल्यानं थेट रेल्वेखाली...

parbhani news : परभणी जिल्ह्यातील सेलत एका कारखान्यात काम करणाऱ्या 25 वर्षीय तरुणाने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली आहे. ही घटना 12 ऑक्टोबर रोजी रविवारी रात्री 10:30 वाजता रावळगाव परिसरात घडली आहे.

parbhani news

parbhani news

मुंबई तक

• 02:03 PM • 14 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

25 वर्षीय तरुणाने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली

point

घटनेनं परिसर हादरून गेला

point

नेमकं काय घडलं?

parbhani news : परभणी जिल्ह्यातील सेलत एका कारखान्यात काम करणाऱ्या 25 वर्षीय तरुणाने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली आहे. ही घटना 12 ऑक्टोबर रोजी रविवारी रात्री 10:30 वाजता रावळगाव परिसरात घडली आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. तरुणाने केलेल्या आत्महत्येचं कारणंही आता समोर आलं आहे. तरुणाने टोकाचं पाऊल उचलण्यामागचं खरं कारण समोर आलं आहे. एका महिलेच्या प्रेमात तो बुडाला होता. मात्र, तिच्या कुटुंबियांनी नकार दिल्याने आत्महत्या केली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : खोक्या भोसलेच्या कुटुंबानंतर आणखी एका महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण, बीडमध्ये नेमकं चाललं काय?

'त्या' रात्री नेमकं काय घडलं? 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माणिक कारभारी खोसे (वय 25) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो सेलू तालुक्यातील ब्राह्मणगाव या शहरातील एका कारखान्यात नोकरी करत होता. त्याचं एका विवाहित महिलेवर प्रेम होतं. महिला ही आपल्या पतीच्या त्रासाला कंटाळून माहेरी आली होती, त्या दोघांमधील प्रेमसंबंध हे अगदी लग्नापर्यंत पोहोचले होते. पण कुटुंबियांनी विरोध केल्यानं तरुण नैराश्यात गेला आणि त्यानं टोकाचं पाऊल उचललं.

घटनेच्या दिवशी म्हणजे 12  ऑक्टोबर रोजी रात्री सायंकाळी 10:30 वाजता रवळगाव परिसरात सेलू-सातोना रेल्वे स्टेशन दरम्यान आपल्या सहकाऱ्यांना सोशल मीडियावरून आत्महत्या करण्याचे कारण्याचे कारण सांगत, मुलीचा आणि आईसोबतचा आपला फोटो पाठवला. त्यानंतर त्यांनं धावत्या रेल्वेखाली उडी घेत आपलं जीवन संपवलं आहे. 

घटनेची माहिती पोलीसांना कळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी  उपजिल्हा रुग्णालयात पाठवला होता. देऊळगाव येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय लोया यांनी शवविछेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे दिला होता.पोलिसांनी तरुणाने आत्महत्या केल्याचं सांगितलं आहे. 

हे ही वाचा : नाशकात झाडांच्या छाटणीसाठी कटर आणला पण डिझेलचा भडका, एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू

पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मधुकर जाधव पुढील तपास करत आहेत.पोलीसांच्या तपासानंतरच माणिक खोसे यांच्या मृत्यूचे ठोस कारण समोर आलं नसल्याचं सांगण्यात येत आहे. 

    follow whatsapp