नेत्यासोबत भररस्त्यात शारीरिक संबंध, व्हायरल व्हिडिओमधील महिलेचे कॉल डिटेल्स पोलिसांच्या हाती!

मुंबई तक

14 Jun 2025 (अपडेटेड: 14 Jun 2025, 02:46 PM)

manoharlal dhakad viral video : मध्य प्रदेशातील मंदसौर येथील दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भाजपचे निकटवर्ती असणारे मनोहरलाल धाकड यांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले होते. मैंदसोर पोलीस फिल्डींग लावत तरुणीच्या मागवरच आहेत. अशातच तरुणीचे कॉल रेकॉर्ड आता पोलिसांकडे आल्याने तिच्या अडचणीत वाढ होऊ लागली आहे. 

महिलेचे कॉल डिटेल्स पोलिसांच्या हाती

महिलेचे कॉल डिटेल्स पोलिसांच्या हाती

Google CTA

बातम्या हायलाइट

point

भाजपचे निकटवर्ती असणारे मनोहरलाल धाकड यांच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणात ट्विस्ट

point

भाजप नेत्यासोबत अश्लील कृत्य करणाऱ्या तरुणीचे कॉल रेकॉर्ड पोलिसांच्या हाती

Manoharlal Dhakad Viral Video : मध्य प्रदेशातील मंदसौर येथील दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भाजपचा निकटवर्ती मनोहरलाल धाकडचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले. या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. संबंधित प्रकरणात अश्लील कृत्य करणाऱ्या महिलेचा पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली आहे. मैंदसोर पोलीस फिल्डींग लावत तरुणीच्या मागावरच आहेत. अशातच तरुणीचे कॉल रेकॉर्ड आता पोलिसांकडे आल्याने तिच्या अडचणीत वाढ होऊ लागली आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : निब्बा निब्बीचं लव्ह! क्रशशी बोलतो म्हणून तरुणाने गुजरातहून गाठलं पुणे अन् अल्पवयीन तरुणावर चाकूने केले सपासप वार

मंदसैर पोलिसांनी खुलासा केला की, व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसणाऱ्या महिलेची ओळख पटण्यासाठी कॉल डिटेल्स आणि इतर पुरावे गोळा केले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लवकरच महिलेचा शोध घेतला जाईल आणि भारतीय दंड संहितेच्या (BNS)कलम 296, 285 आणि 3/5 अंतर्गत कारवाई करण्यात येईल. पोलिसांनी या प्रकरणात तरुणीला ताब्यात घेण्यासाठी मोठा प्लॅन रचला आहे. 

नेमकं काय होतं प्रकरण? 

मे महिन्यात दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवरील एक अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओत भाजप नेता मनोहर लाल धाकड आणि एक तरुणी दोघेही अश्लील कृत्य करताना दिसत होते. या व्हिडिओमुळे मध्य प्रदेशच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, व्हायरल झालेल्या घटनेची देशभर चर्चा झाली होती. अशावेळी विरोधकांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. 

दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओतील मंदसौर पोलिसांनी कारवाई केली आणि मनोहर लाल धाकड यांच्याविरोधात बीएनएसच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. परंतु न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. यानंतर व्हिडिओत दिसणाऱ्या महिलेविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 

हेही वाचा : पुण्यात वाहनचालकाने गाठला बेशिस्तपणाचा कळस, विनापरवाना कार फुटपाथवर चढवली अन् तरुणीला ठोकर देत संपवलं

या घटनेला एका महिन्याहून अधिकचा काळ गेला आहे. परंतु व्हिडिओत अश्लील वर्तन करणाऱ्या महिलेला अटक करण्यात यश आलं नाही. दरम्यान, पोलिसांनी तरुणीची शोधमोहिम सुरुच ठेवली आहे.