Pooja Khedkar: 'चोराला सोडा...' IAS पूजा खेडकरांनी केलेला थेट DCP ला कॉल, नवा कारनामा आला समोर

Pooja Khedkar Case Update : मे महिन्याच्या दरम्यान नवी मुंबई पोलिसांच्या डीसीपीला फोन केला होता. यावेळी पूजा खेडकर यांनी नवी मुंबई पोलिसांवर दबाव टाकला होता. या प्रकरणाचा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने अहवाल तयार करून गृह विभागाला सादर केला आहे.

पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांचा आता एक नवीन कारनामा समोर आला आहे.

pooja khedkar case update pressure put on police to release accuse navi mumbai police sent report delhi

मुंबई तक

12 Jul 2024 (अपडेटेड: 12 Jul 2024, 03:33 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पूजा खेडकर यांनी नवी मुंबई पोलिसांवर टाकला दबाव

point

पूजा खेडकर यांचा पाय आणखीण खोलात जाणार

point

नवी मुंबई पोलिसांनी अहवाल दिल्लीत पाठवला

Pooja Khedkar Case Update : दिपेश त्रिपाठी, मुंबई : महाराष्ट्र कॅडर 2023 बॅचच्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यात आता पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांचा आता एक नवीन कारनामा समोर आला आहे. यामध्ये पूजा खेडकर यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. एका प्रकरणात चोराची सुटका करण्यासाठी पूजा खेडकर यांनी हा दबाव टाकला होता. या प्रकरणाचा अहवाल आता नवी मुंबई (Navi Mumbai) पोलिसांना दिल्यानंतर तो आता दिल्लीत पाठवण्यात आला आहे. त्यामुळे आता पूजा खेडकर यांचा पाय आणखीण खोलात जाण्याची शक्यता आहे. (pooja khedkar case update pressure put on  police to release accuse navi mumbai police sent report delhi) 

हे वाचलं का?

स्टील चोरी प्रकरणात पूजा खेडकर यांच्या नातेवाईकाला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. या नातेवाईकाची चोरीच्या प्रकरणातून सूटका करण्यासाठी पूजा खेडकर यांनी मे महिन्याच्या दरम्यान नवी मुंबई पोलिसांच्या डीसीपीला फोन केला होता. यावेळी पूजा खेडकर यांनी नवी मुंबई पोलिसांवर दबाव टाकला होता. या प्रकरणाचा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने अहवाल तयार करून गृह विभागाला सादर केला आहे. 

हे ही वाचा : Vidhan Parishad Election 2024: BJP आमदार गणपत गायकवाड तुरुंगातून आले मतदानाला, पण कोणामुळे वेटिंगवर?

नवी मुंबई पोलिसांनी हा अहवाल बुधवारी पाठवला होता. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी हा अहवाल पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालासह गुरुवारी लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (LBSNAA), संचालक श्रीराम तारनिकांती यांना पाठवला आहे. ती प्रशिक्षणार्थी अधिकारी असल्यामुळे राज्य सरकार तिच्याविरुद्ध कारवाई करू शकत नाही म्हणून हा LBSNAA ला पाठवण्यात आला आहे. 

 एक सदस्यीय समिती करणार चौकशी 

 द हिंदूने दिलेल्या एक्सवर दिलेल्या माहितीनुसार, पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांच्या उमेदवारीचे दावे आणि इतर कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी केंद्र सरकारने एक चौकशी समिती नेमली आहे. भारत सरकारच्या अतिरिक्त सचिव दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती आता पुजा खेडकर यांच्या प्रकरणाची चौकशी करणार आहे. या समितीला 2 आठवड्यात या चौकशीचा अहवाल सादर करायचा आहे. त्यामुळे या चौकशीत आता काय सत्य समोर येते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

    follow whatsapp