Maharashtra Weather : राज्यात थंड वाऱ्याचे प्रवाह थांबल्याने हवामानात काही प्रमाणात बदल जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात आता ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तर त्याचा परिणाम हा तापमानावर होताना दिसतो. यामुळे काही भागांमध्ये थंडीचा कडाका कायम राहण्याचे वृत्त आहे. अशातच ढगाळ वातावरणाने राज्यातील विविध भागांमध्ये पहाटचे धुके आणि दव पडण्याची स्थिती निर्माण झाल्याचं सांगण्यात ये आहे. पाहुयात, 6 जानेवारी रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : वासनांध काकीचे पुतण्यासोबत होते शारीरिक संबंध, पण काकासोबत...
कोकण :
कोकण विभागात वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईत कमाल तापमानात सुमारे 30 अंश सेल्सिअस, किमान तापमान हे 18 अंश सेल्सिअस इतकं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तसेचत दिवसभर अंशतः ढगाळ वातावरण राहील. सकाळच्या सुमारास धुके जाणवू शकतात.
पश्चिम महाराष्ट्र :
पश्चिम महाराष्ट्रात हवामान विभागाने थंडीचा जोर कमी झाल्याचं चित्र आहे असं सांगितलं. याच विभागातील पुणे शहरात पहाटे धुक्याची स्थिती असून नागरिकांनी काळजी घेणे गरजेचं असल्याचं सांगितलं. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील इतर काही जिल्ह्यांमध्ये अशीच परिस्थिती कायम राहील असा अंदाज वर्तवला.
मराठवाडा :
मराठवाडा विभागात हवामान हे प्रामुख्याने निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरात किमान तापमानात वाढ झाल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. तसेच थंडीचा प्रभाव कमी असेल असा हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.
हे ही वाचा : चंद्रपूर महापालिका निवडणूक 2017 मध्ये भाजपचा दणदणीत विजय, तर 2025-26 मध्ये कशी असेल रणनीती?
विदर्भ :
विदर्भ विभागात सकाळच्या वेळेत धुक्याची चादर पसरणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. याच विभागातील नागपुरात कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतकं राहील.
ADVERTISEMENT











