Maharashtra weather : राज्यात 'या' विभागात हिमलाटेचं सावट, हवामानाचा महत्त्वाचा अलर्ट

Maharashtra Weather : राज्यात अधिक गारठा वाढण्याची शक्यता आहे, 7 जानेवारी रोजी राज्यात एकूण हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. जाणून घ्या हवामानाचा एकूण अंदाज पुढीलप्रमाणे...

maharashtra weather

maharashtra weather

मुंबई तक

• 05:00 AM • 07 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात अधिक गारठा वाढण्याची शक्यता आहे

point

7 जानेवारी रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather : राज्यात अधिक गारठा वाढण्याची शक्यता आहे, 7 जानेवारी रोजी राज्यात एकूण हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. राज्यात काही प्रमाणात पाऊस किंवा ढगाळ वातावरण नसेल. पण उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे काही भागांमध्ये तापमानात घट निर्माण होऊन थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत कोण आहे सर्वात श्रीमंत उमेदवार? यादीच आली समोर

कोकण :

कोकण विभागात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईत तापमान हे 30-32 अंश सेल्सिअस आणि किमान 18-20 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. सकाळी हलक्या धुक्यांचे वातावरण राहील.

पश्चिम महाराष्ट्र :

पश्चिम महाराष्ट्रात थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. पुण्यात किमान तापमान हे 12-14 अंशापर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमान हे 28-30 अंशापर्यंत राहण्याची शक्यता आहे. यामुळे सकाळी आणि सायंकाळी गारठा वाढण्याची शक्यता आहे.

मराठवाडा :

मराठवाड्यातील किमान तापमान हे 10-12 अंशापर्यंत घसरण्याची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान 28-31 अंश राहण्याची शक्यता आहे. तसेच सकाळी काही ठिकाणी दाट धुक्याची शक्यता आहे. यामुळे अडथळा निर्माण येण्याची शक्यता आहे. तसेच दिवसभर वातावरण कोरडं राहण्याची शक्यता आहे.

विदर्भ :

हे ही वाचा : पती परदेशात राबायचा, इकडं मामीचं भाच्यासोबत जुळलं सूत, 3 वर्षाच्या मुलीला टाकून गेली पळून

विदर्भ विभागात थंडीची लाट राहील. नागपूर, वर्धा आणि अमरावतीत शीतलहरी जाणवेल. तसेच नागपूरमधे किमान तापमान हे 9 अंश खाली जाण्याची शक्यता आहे, यामुळे थंडीची लाट जाणवणार आहे. तसेच थंड वाऱ्यामुले रात्री आणि सकाळी कडाक्याची थंडी पडेल. धुक्यासह कोरडं हवामान कायम रहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

    follow whatsapp