Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये एका तरुणाने त्याच्या साथीदारांसोबत मिळून आपल्या मित्राचा निर्घृण खून केल्याचं वृत्त समोर आलं आहे. मृताचं नाव शकील आरेफ शेख (20) असून तो पंढरपूरच्या फुलेनगर येथील रहिवासी आहे. मोबाईल आणि पैशांच्या वादातून ही धक्कादायक घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. आरोपींनी हत्येनंतर, पीडित तरुणाचा मृतदेह जटवाडा येथील डोंगराळ भागात फेकून दिला.
ADVERTISEMENT
सिय्यद सिराज अली अशी प्रकरणातील आरोपीची ओळख असून तो एक सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, शकील हा गेल्या 4 जानेवारीपासून बेपत्ता असून त्याचा शोध सुरू होता. खरं तर, 4 जानेवारी रोजी तो त्याच्या मित्रासोबत म्हणजेच सिराजसोबत घराबाहेर पडला होता आणि त्यानंतर, त्याच्याशी संपर्क होत नव्हता.
हे ही वाचा: वर्दी घालून आला अन् रात्री घराबाहेर पडलेल्या तरुणीला उचललं... बळजबरीने स्कोर्पिओत बसवून सामूहिक बलात्कार!
मृताच्या आईला फोन करून धमकी
शकीलचा शोध सुरू असतानात काल म्हणजेच मंगळवारी (6 जानेवारी) सकाळच्या सुमारास मिटमिटा परिसरातील डोंगर भागात स्थानिकांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक मृतदेह आढळला. तात्काळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली आणि माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तपास केला असता तो मृतदेह बेपत्ता असलेल्या शकीलचा असल्याचं समोर आलं. मिळालेल्या माहितीनुसार, शकील बेपत्ता होण्यापूर्वी आरोपीने शकीलच्या आईला फोन करून मोबाईल आणि पैसे परत केले नसल्याने मुलाला ठार मारून टाकण्याची धमकी दिली.
हे ही वाचा: मुंबई: दिव्यांग तरुणीचं अपहरण अन् बलात्कार! पुरावे मिटवण्यासाठी अंघोळ सुद्धा घातली अन्... आता, कोर्टाचा 'तो' निर्णय
पोलिसांचा तपास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणांनी पीडित शकीलला कारमध्ये बसवून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. इतकेच नव्हे तर, त्यांनी शकीलच्या शरीरावर सिगारेटचे चटके दिल्याचं सांगितलं जात आहे. शेवटी, आरोपींनी शकीलचे हात-पाय आणि गळा चिरून त्याची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर, पीडित तरुणाचा मृतदेह जटवाडा परिसरातील डोंगराळ भागात फेकून देण्यात आला. संबंधित प्रकरणात, छावणी पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा तपास केल्यानंतर, आरोपी सिराज अलीचं नाव समोर आलं आणि पोलिसांनी तातडीने त्याच्याविरुद्ध कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतलं असून उर्वरित फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.
ADVERTISEMENT











