समोसेवाल्या काकांनी 10 वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार, क्रूरतेची सीमा गाठत... न्यायालयाने दिली 20 वर्षांची शिक्षा

Thane Crime : ठाणे न्यायालयाने 10 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका पुरुषाला 20 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

Thane Crime

Thane Crime

मुंबई तक

06 Jan 2026 (अपडेटेड: 06 Jan 2026, 06:03 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

ठाणे न्यायालयाने 10 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी घेतला निर्णय

point

न्यायाधीशांचा प्रकरणाबाबत निकाल...

point

गुन्ह्यासाठी आरोपीला 20 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा​​​​​​​

Thane Crime : ठाणे न्यायालयाने 10 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका पुरुषाला 20 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या प्रकरणाचा 3 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात आला होता. दरम्यान, न्यायाधीश रुबी यू, मालवणकर यांनी म्हटलं की, '35 वर्षीय आरोपी, ज्याला परिसरातील मुले प्रेमाने समोसावाले काका म्हणायचे, कारण तो त्यांना समोसे खायला द्यायचा. परंतु याच समोशाचे आमिष दाखवून त्याने मुलीचा विश्वास तोडला. याचमुळे न्यायालयाने ही शिक्षा दिल्याचे वृत्त समोर आलं.

हे वाचलं का?

हे ही वाचा : अमरावती एमआयडीसीत थिनर कारखान्यात मोठा स्फोट, महिला कामगाराचा आगीत होरपळून मृत्यू

आरोपीचं नाव विजयभान असे असून तो ठाणे शहरातील वर्तकनगर परिसरातील नेहरूनगर झोपडपट्टीतील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला भारतीय न्याय संहिता कलम 376 (2) (N), 506 आणि पोक्सो कायद्याच्या कलम 5 आणि 6 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले होते. 

शिक्षिकेन पीडितेचा रक्तस्त्राव होताना पाहिले

दरम्यान, या प्रकरणात फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेला जबरदस्तीने आपल्या घरी नेले आणि नंतर 4 जानेवारी 2024 दरम्यान तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याचं वृत्त होतं. तसेच 23 जानेवारी 2024 रोजी हे प्रकरण उघडकीस आलं. जेव्हा एका शिक्षिकेन पीडितेचा रक्तस्त्राव होताना पाहिले आणि तिच्या आईला कळवले.

न्यायाधीशांचा प्रकरणाबाबत निकाल...

न्यायाधीशांनी निकाल देताना म्हटलं की, 'या प्रकरणातील काही तथ्ये आणि परिस्थिती विचारात घेतल्यानंतर लक्षात येतं की, मुलं आरोपी समोसेवाल्याला काका म्हणत होते. त्चादरम्यान, आरोपी हा पीडितेला आपल्या घरी घेऊन जायचा आणि लैंगिक छळ करायचा', असं त्यांनी न्यायालयात बाजू मांडली होती. 

हे ही वाचा : संग्राम जगतापांच्या पीएची दहशत? अंधारेंनी व्हिडीओ बाहेर काढला! 'विरोधी उमेदवाराला बंदुक दाखवली...'

गुन्ह्यासाठी आरोपीला 20 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

या प्रकरणी तपास अधिकाऱ्यांना कोणतेही साक्षीदार सापडले नाहीत ही एक वस्तुस्थिती पीडितेची साक्ष फेटाळण्यास कारणीभूत ठरू शकत नाही. अशातच आरोपीला 5 हजार रुपये दंड आणि न्यायालयाने पोक्सो अंतर्गत गुन्ह्यासाठी आरोपीला 20 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली.

    follow whatsapp