Palghar College hostel Namaz News : आयडियल फाऊंडेशन कॉलेजच्या फिजिओथेरपी अभ्यासक्रमासाठी चार दिवसापूर्वी प्रवेश घेतलेल्या एका हिंदू विद्यार्थिनीला रात्रीच्या वेळी नमाज पढायला लावल्याचा प्रकार उघडकीस आलाय. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील पोशेरी परिसरात हे कॉलेज असून या संदर्भात वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी वाडा पोलीस स्टेशनमध्ये हजर राहून घटनेची माहिती घेतली. तसेच या प्रकाराबाबत त्यांनी कॉलेजला भेट दिली.
ADVERTISEMENT
विद्यार्थीनीसोबत रॅगिंगचा प्रकार, वाडा पोलिसात गुन्हा दाखल
अधिकची माहिती अशी की, आयडियल फाऊंडेशनच्या उच्च व तंत्र शिक्षणातील विविध विद्या शाखांना मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. चार दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील अश्विनी बिल्लर सदगीर या विद्यार्थिनीने फिजिओथेरपी अभ्यास क्रमाकरिता प्रवेश घेतला होता. कॉलेजच्याच वसतीगृहात अन्य विद्यार्थिनीसह ती राहत होती. दरम्यान रविवार 4 तारखेला रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तिला जबरदस्तीने नमाज पढायला लावण्यात आला. या प्रकाराने भेदरलेल्या अश्विनीने घडलेल्या प्रकाराची माहिती आपल्या पतीला व वडिलांना कळवली. त्यानंतर संबंधित कॉलेज प्रशासनाकडे या संदर्भात तक्रार केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संबंधित महिलेने पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
दरम्यान या गंभीर प्रकाराने सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण होऊन नये याची दक्षता घेऊन पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. शिवाय तातडीने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली. गुन्ह्याचा अधिक तपास वाडा पोलीस करीत आहेत.
पालघरचे पोलीस अधिक्षक यतीश देशमुख याबाबत बोलताना म्हणाले, प्रथम वर्षात शिकणाऱ्या मुलीने तिच्यासोबत रॅगिंगचा प्रकार झाल्याची तक्रार दिली. त्या अनुषंगाने वाडा पोलीसचे स्टेशनचे अधिकारी आणि देखील घटनास्थळी पोहोचलो. याबाबत आम्ही सखोल चौकशी करतोय. कॉलेज मॅनेजमेंटने याबाबत समिती नेमली आहे. याबाबत सत्यता आढळल्यास तातडीने कारवाई करण्यात येईल.
इतर महत्त्वाच्या बातम्या
बीड हादरलं, भरदिवसा कामगारावर गोळ्या झाडल्या, पण नेम चुकला, मग धारदार शस्त्रांनी वार करुन संपवलं
ADVERTISEMENT











