सोलापूर हादरले, कॉलेजचं प्रेम, पण आईचा लग्नाला विरोध, आदित्यने स्नेहाला संपवलं! स्वत:च्याही गळ्यावर वार केले

Solapur Crime News : मुलीच्या आईचे माहेर हे अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी (ता.अक्कलकोट) येथे आहे. मुलीचे मामा खाजप्पा पोतेनवरू हे मैंदर्गीत राहतात. तेथे स्नेहा बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी मामाकडे होती. येथे मैंदर्गीजवळील नागूरतांडा येथील आदित्यशी तिची ओळख झाली.

Solapur Crime News

Solapur Crime News

मुंबई तक

05 Jan 2026 (अपडेटेड: 05 Jan 2026, 03:24 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सोलापूर हादरले, कॉलेजचं प्रेम, पण आईचा लग्नाला विरोध

point

आदित्यने स्नेहाला संपवलं! स्वत:च्याही गळ्यावर वार केले

Solapur Crime News : सोलापूरच्या एका तरुणीचा अक्कलकोटमध्ये गळा चिरून निघृण खून झाल्याची घटना रविवारी घडली. सोबत असलेल्या प्रियकरानेच तिचा खून केला आणि स्वतःच्या गळ्यावरही त्याने धारधार शस्त्राने वार केले. त्यात तोही गंभीर जखमी झाला आहे. अक्कलकोट येथील बासलेगाव रोडवरील लोखंडे मंगल कार्यालयाच्या पाठीमागे (पिरजादे प्लॉटमधील कोळी यांच्या घरात) सकाळी 10.30 ते 11.45 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. स्नेहा श्रीकांत बनसोडे (वय 20, रा.रामवाडी, सोलापूर) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. आदित्य रमेश चव्हाण (रा.नागूरतांडा, ता. अक्कलकोट) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

हे वाचलं का?

जखमी तरुणावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रियकर आदित्य चव्हाण यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे.

हेही वाचा : सांगली : रेल्वेच्या तिकीटावरुन झाला महिलेचा हत्येचा उलगडा, पहिले लग्न लपवून ठेवल्याने पती अन् सासऱ्यानेच केला खून

महाविद्यालयीन शिक्षण घेताना झाली ओळख

मुलीच्या आईचे माहेर हे अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी (ता.अक्कलकोट) येथे आहे. मुलीचे मामा खाजप्पा पोतेनवरू हे मैंदर्गीत राहतात. तेथे स्नेहा बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी मामाकडे होती. येथे मैंदर्गीजवळील नागूरतांडा येथील आदित्यशी तिची ओळख झाली. तो स्नेहास मोबाइलवरून 'तुझ्यासोबत लग्न करणार आहे,' असे म्हणायचा. 'तू तिच्याशी बोलू नको, परत आमच्या घराकडे फिरकू नको, तुझ्यासोबत आम्ही मुलीचे लग्न लावून देणार नाही,' असे कुटुंबियांनी त्याला सांगितले होते. तरीही दोघे संपर्कात होते. त्यातूनच हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

स्नेहा नववर्षानिमित्त देवदर्शनाला म्हणून गेली होती

रविवारी दुपारी दीडच्या सुमारास आई शाळेतून घरी आली. त्यावेळी मुलगी स्नेहा घरात नव्हती."आईने दुसरी मुलगी प्रतीक्षाला विचारले असता स्नेहा नवीन वर्षानिमित्त स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला गेल्याचे तिने सांगितले. त्यानंतर शेजारच्या मैत्रिणीकडून स्नेहाचा अक्कलकोटमध्ये घातपात झाल्याचे समजले. त्यानंतर आई व नातेवाईक अक्कलकोटमधील सरकारी दवाखान्यात आले. स्नेहाच्या गळ्यावर धारदार तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने रक्तस्त्राव झाल्याने उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कल्याणमध्ये स्वकियांकडून ठाकरेंचा घात? वरिष्ठ नेत्याकडून परस्पर आदेश? अर्ज माघारी घेणाऱ्या उमेदवाराचे आरोप

    follow whatsapp