नांदेडमध्ये हळहळ, 60 वर्षीय नराधमाकडून 8 वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग, लाज आणणारा प्रकार उघडकीस

Nanded News : एका 60 वर्षीय नराधमाने अवघ्या 8 वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Nanded Crime News

Nanded Crime

मुंबई तक

• 04:29 PM • 05 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात धक्कादायक प्रकार

point

60 वर्षीय नराधमाकडून 8 वर्षाच्या चिमुकलीवर विनयभंग

Nanded News : नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यातील लालवंडी येथे माणुसकीला काळिमा फासण्यात येणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका 60 वर्षीय नराधमाने अवघ्या 8 वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'मराठी माणसांवर सत्ता गाजवण्यासाठी युपी बिहारहून प्रचारासाठी गाड्या', शिवसैनिकाने व्हिडिओ शेअर करत केले आरोप

नेमकं प्रकरण काय? 

घडलेल्या घटनेनुसार, लालवंडी येथील 8 वर्षांची पीडित मुलगी घराबाहेर खेळत होती, तेव्हाच तुळशीराम विठ्ठल इंगळे (वय 60) याने तिला फसवून तिच्याच आजोबांच्या बंद सघरात नेले. नंतर त्या चिमुकलीवर हैवानी कृत्य केलं. चिमुकली पूर्णपणे घाबरून गेली होती, तिने कसातरी नराधमाच्या तावडीतून पळ काढल्याचं चित्र आहे आणि घटनास्थळावरून तिने सूटका करून घेतली होती.

आरोपीच्या आवळल्या मुसक्या 

भयभीत झालेल्या अवस्थेत मुलीने घरी जाऊन रडत रडत घडलेला सर्व प्रकार हा आपल्या आईला सांगितला होता. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेतल्याचं वृत्त आहे. या प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रार करून पोलिसांनी चक्र फिरवली आणि आरोपी तुळशीराम इंगळे याच्या लालवंडी येथून मुसक्या आवळल्या. आरोपीवर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी पुढील तपास केला आहे.

हे ही वाचा : कल्याणमध्ये स्वकियांकडून ठाकरेंचा घात? वरिष्ठ नेत्याकडून परस्पर आदेश? अर्ज माघारी घेणाऱ्या उमेदवाराचे आरोप

या घटनेमुळे आता लहान मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. दरम्यान, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होताना दिसत आहे.

    follow whatsapp