Govt Jobs : वर्षाला लाखो रुपयांचं पॅकेज हवंय? मग SBI मधील ही संधी सोडू नका, लगेच करा अर्ज

मुंबई तक

• 04:19 PM • 06 Sep 2026

भारतीय स्टेट बँकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. या भरतीअंतर्गत 'स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर' या पदासाठी रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना वर्षाला लाखो रुपयांचं पॅकेज दिलं जाणार आहे.

SBI Recruitment

SBI Recruitment

Google CTA

बातम्या हायलाइट

point

वर्षाला लाखो रुपयांचं पॅकेज हवंय?

point

मग SBI मधील ही संधी सोडू नका

point

लगेच करा अर्ज

SBI Recruitment : भारतीय स्टेट बँकेमध्ये अनुभवी उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. या भरतीअंतर्गत 'स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर' या पदासाठी एकूण 207 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने झोनल हेड (रिटेल), रिजनल हेड, रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड), इन्व्हेस्टमेंट स्पेशलिस्ट, इन्व्हेस्टमेंट ऑफिसर तसेच व्हीपी (VP) आणि एव्हीपी (AVP) वेल्थ यांसारख्या उच्चस्तरीय व्यवस्थापकीय पदांचा समावेश आहे. संपूर्ण देशभरात कुठेही नोकरी करण्याची तयारी असणाऱ्या पात्र उमेदवारांकडून या महत्त्वपूर्ण पदांसाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता काय?

या पदांसाठी उमेदवारांकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि संबंधित क्षेत्रातील कामाचा मोठा अनुभव असणे बंधनकारक आहे. झोनल हेड, रिजनल हेड, रिलेशनशिप मॅनेजर आणि वेल्थ विभागाच्या पदांसाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक असून त्यांना पदानुसार 3 ते 15 वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. तर, इन्व्हेस्टमेंट स्पेशलिस्ट आणि इन्व्हेस्टमेंट ऑफिसर या पदांसाठी फायनान्स, इकॉनॉमिक्स, कॉमर्स किंवा बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी (PG) किंवा सीए (CA/CFA) पूर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच 31 ऑगस्ट 2026 रोजी उमेदवारांचे वय पदानुसार किमान 23 ते कमाल 50 वर्षांच्या दरम्यान असावे. सरकारी नियमांनुसार एससी/एसटी (SC/ST) उमेदवारांना वयोमर्यादेत 5 वर्षांची, तर ओबीसी (OBC) उमेदवारांना 3 वर्षांची सवलत देण्यात आली आहे.

हे ही वाचा : हिंदू आणि मुस्लिमांना सतर्क राहण्याचे राज ठाकरेंचे आवाहन, नेमकं काय म्हणाले?

वार्षिक पॅकेज किती?

निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदाच्या आणि अनुभवाच्या आधारावर अतिशय आकर्षक वेतन दिले जाणार आहे. या पदांसाठी वार्षिक पॅकेज (CTC) 27.10 लाख रुपयांपासून ते थेट 97 लाख रुपयांपर्यंत असणार आहे, ज्यामध्ये निश्चित वेतनासह कामगिरीवर आधारित अतिरिक्त वेतनाचाही समावेश राहील. महत्त्वाची बाब म्हणजे ही सर्व पदे सुरुवातीला 5वर्षांच्या कंत्राटी तत्त्वावर भरली जाणार असून, बँकेच्या निर्णयानुसार पुढे या करारात वाढ देखील केली जाऊ शकते. तसेच, गरज पडल्यास दोन्ही बाजूंनी किमान दोन महिन्यांची पूर्वसूचना देऊन किंवा दोन महिन्यांचे वेतन देऊन हा करार केव्हाही संपुष्टात आणण्याची तरतूद यात करण्यात आली आहे.

हे ही वाचा : जन्मष्टमीच्या रात्री मंदिरात गेलेल्या 14 वर्षीय मुलीवर अत्याचार 

अर्ज कसा करावा?

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज सादर करायचा आहे. खुल्या (General), ईडब्ल्यूएस (EWS) आणि ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 750 रुपये परीक्षा शुल्क निश्चित करण्यात आले आहे, तर एससी (SC), एसटी (ST) आणि दिव्यांग (PWD) उमेदवारांना या शुल्कातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर असून, उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता वेळेत आपले अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.