Red Soil Stories: Youtube VIDEO, Shorts वर दिसणाऱ्या या 33 वर्षांच्या तरूणाच मृत्यू, कोण आहे शिरीष गवस?

Red Soil Stories यूट्यूब चॅनेलचे निर्माते शिरीष गवस याचे वयाच्या 33 व्या वर्षी अचानक निधन झालं. जाणून घ्या नेमके कोण होते शिरीष गवस.

red soil stories death of this 33 year old man seen on youtube video shorts know who is shirish gavas

फाइल फोटो, सौजन्य: Instagram

मुंबई तक

• 07:20 PM • 02 Aug 2025

follow google news

सिंधुदुर्ग: कोकणातील सांस्कृतिक आणि ग्रामीण जीवनाचा सुंदर आविष्कार घडवणाऱ्या Red Soil Stories या यूट्यूब चॅनेलचा निर्माते आणि लोकप्रिय यूट्यूबर शिरीष गवस याचे वयाच्या अवघ्या 33 व्या वर्षी निधन झालंच. दरम्यान, हे वृत्त समोर आल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 1 ऑगस्ट 2025 रोजी गोव्यातील एका रुग्णालयात शिरीषने अखेरचा श्वास घेतला. मेंदूच्या गंभीर आजाराशी त्याची झुंज अपयशी ठरली. त्याच्या पश्चात त्यांची पत्नी पूजा गवस, एक वर्षाची मुलगी असा परिवार आहे.

हे वाचलं का?

कोण आहे शिरीष गवस?

शिरीष आणि पूजा गवस यांनी 2020 साली कोव्हिडच्या काळात मुंबईतून आपली नोकरी सोडून कोकणातील आपल्या मूळ गावी परतण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनातून बाहेर पडत त्यांनी महाराष्ट्र आणि गोवा सीमेवरील म्हणजेच कोकणातील एका छोट्याशा गावात नव्याने आयुष्याला सुरुवात केली होती. यावेळी त्यांनी Red Soil Stories हे यूट्यूब चॅनेल सुरू केलं होतं. ज्यामध्ये त्यांनी कोकणातील पारंपरिक खाद्यसंस्कृती, शेती, परंपरा या गोष्टी अत्यंत सुंदर आणि साधेपणाने व्हिडिओच्या माध्यमातून जगासमोर आणल्या होत्या.

चुलीवर बनवलेले पारंपरिक पदार्थ, शेतीतील दैनंदिन कामे, कोकणातील सण-उत्सव आणि ग्रामीण जीवनातील साधेपणा हे त्यांच्या व्हिडिओजचे प्रमुख विषय असायचे. त्यांचा साधेपणा आणि कोकणी बाज हा जगभरातील मराठी चाहत्यांना आवडू लागल्याने अल्पवधीतच त्यांचे व्हिडिओ हे व्हायरल झाले होते. तेव्हापासून त्यांच्या Red Soil Stories या यूट्यूब चॅनलचे यूजर्सही प्रचंड वाढले होते.

हे ही वाचा>> 42 वर्षांची महिला लागली बॉयफ्रेंडच्या नादी, 18 आणि 16 वर्षाच्या मुलांना दिलं सोडून आणि स्वत:..

शिरीष आणि पूजाचा प्रेरणादायी प्रवास

शिरीष आणि पूजा यांनी मुंबईतील कॉर्पोरेट आयुष्य सोडून गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्यासमोर अनेक आव्हाने होती. परंतु, त्यांनी संकटाला संधीत बदलले. एका चिनी ब्लॉगरच्या व्हिडीओमधून प्रेरणा घेऊन त्यांनी आपलं Red Soil Stories चॅनल सुरू केलं होतं. ज्यामध्ये पूजा गवस ही कोकणातील खाद्यसंस्कृतीमधील पारंपरिक पदार्थ बनवून दाखवायची तर शिरीष शूटिंग आणि इतर गोष्टी पाहत असे..

त्यांच्या यूट्यूब चॅनेलचे आतापर्यंत 4 लाख 27 हजारांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय मराठी कार्यक्रमातही त्यांना बोलावण्यात आलं होतं. ज्यामुळे त्यांना अधिक प्रसिद्धीही मिळाली होती.

शिरीष यांचा आजार आणि निधन

मिळालेल्या माहितीनुसार, शिरीष गवस याला मागील काही महिन्यांपासून मेंदूशी संबंधित गंभीर आजाराचे निदान झाले होते. त्याच्यावर गोव्यातील रुग्णालयात उपचार देखील सुरू होते. परंतु, काल (1 ऑगस्ट 2025)  अचानक त्याची प्रकृती अधिक खालावली आणि त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. अवघ्या वर्षभरापूर्वी शिरीष आणि पूजा यांना कन्यारत्न झालं होतं. नुकताच त्यांच्या मुलीचा वाढदिवस देखील त्यांनी साजरा केला होता. मात्र, या सगळ्यात शिरीष याचे ज्या पद्धतीने जगाचा निरोप घेतला त्याने संपूर्ण गवस कुटुंबीय हादरून गेलं आहे. त्याच्या अकाली निधनाने त्याच्या कुटुंबीय आणि चाहत्यांवर अक्षरश: दुखाचा डोंगर कोसळला आहे.

हे ही वाचा>> "सध्या, मुली नग्न होऊन पैसे कमवतात" साध्वी ऋतंभरांनी केलं 'ते' विधान अन् पुन्हा वाद...

शिरीष गवस यांच्याविषयी

1. 2020: Red Soil Stories ची सुरुवात

शिरीष आणि पूजा गवस यांनी कोविड-19 महामारीच्या काळात मुंबईतील नोकऱ्या गमावल्यानंतर कोकणातील गावी परतण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कोकणातील ग्रामीण जीवन, खाद्यसंस्कृती आणि सांस्कृतिक वारसा जगासमोर आणण्यासाठी Red Soil Stories यूट्यूब चॅनेल सुरू केले.

2. 2020-2024: चॅनेलची लोकप्रियता

शिरीष आणि पूजा यांनी कोकणातील पारंपरिक पदार्थ, शेती आणि सण-उत्सवांवर आधारित व्हिडीओ बनवले. ज्यामधून त्यांनी 4.27 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स मिळवले. त्यांच्या 161 व्हिडीओजनी 40 हून अधिक देशांतील प्रेक्षकांना आकर्षित केले.

3. 2024: कौटुंबिक आनंद

शिरीष आणि पूजा यांच्या घरी एका मुलीचा जन्म झाला, ज्यामुळे त्यांचे जीवन आनंदाने बहरले. त्यांनी आपल्या व्हिडीओजमधून हा आनंद चाहत्यांसोबत शेअर केला होता.

4. 2025 जुलै महिन्यात शिरीषची प्रकृती अचानक खालावली

शिरीषला मेंदूशी संबंधित गंभीर आजार असल्याचे निदान झाले. त्याच्यावर गोव्यातील रुग्णालयात उपचार सुरू झाले.

5. 1 ऑगस्ट 2025: दुखद निधन  

मेंदूच्या आजाराशी झुंज देताना शिरीषचे गोव्यातील रुग्णालयात वयाच्या 33 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी पूजा, एक वर्षाची मुलगी असा परिवार आहे.

6. 2 ऑगस्ट 2025: सोशल मीडियावर शोक

शिरीष यांच्या निधनाची बातमी समजताच X, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चाहत्यांनी आणि सहकारी यूट्यूबर्सनी शोक व्यक्त केला. त्यांच्या कार्याचे कौतुक करत अनेकांनी श्रद्धांजली वाहिली.

शिरीष गवस यांच्याविषयी काही प्रश्न-उत्तरं

1. शिरीष गवस कोण होते?  

- शिरीष गवस हे Red Soil Stories या यूट्यूब चॅनेलचे निर्माते आणि लोकप्रिय यूट्यूबर होते, ज्यांनी कोकणातील सांस्कृतिक आणि ग्रामीण जीवन जगासमोर आणले.

2. Red Soil Stories चॅनेल कशाबद्दल आहे?  

- हे चॅनेल कोकणातील पारंपरिक खाद्यसंस्कृती, शेती, सण-उत्सव आणि ग्रामीण जीवनशैलीवर आधारित व्हिडीओ बनवते, ज्याला 4.27 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत.

3. शिरीष गवसचे निधन कधी आणि कशामुळे झाले?
   
- शिरीष याचे 1 ऑगस्ट 2025 रोजी गोव्यातील रुग्णालयात मेंदूच्या गंभीर आजारामुळे निधन झाले.

4. शिरीषच्या पश्चात त्यांचा परिवार कोण आहे?  

- त्यांच्या पश्चात पत्नी पूजा गवस आणि एक वर्षाची मुलगी आहे.

    follow whatsapp