Shirish More Death News : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज शिरीष महाराज मोरे (30) यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. शिरीष महाराज यांनी आज सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास गळफास घेऊन जीवनं सपंवल्याची माहिती समोर आलीय. या धक्कादायक घटनेमुळं हरिभक्त पारायण आणि वारकरी सांप्रदायात एकच खळबळ उडाली आहे. शिवव्याख्याते म्हणून लोकप्रिय असलेल्या शिरीष महाराजांनी टोकाचं पाऊल का उचचलं, याबाबत कोणतंही कारण समोर आलेलं नाहीय. आर्थिक अडचणींमुळे त्यांनी स्वत:चं जीवन संपवल्याचं पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे.
ADVERTISEMENT
शिरीष महाराज यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली आहे. यामध्ये म्हटलंय की, ते आर्थिक समस्येमुळे आत्महत्या करत आहेत. दरम्यान, शिरीष महाराज तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज होते. निगडीत त्यांचा इडली रेस्टोरंटही होता. त्यांच्या पश्चात आई आणि वडील आहे. गेल्या महिन्यात त्याचं लग्न ठरलं होतं. लग्न एप्रिल किंवा मे महिन्यात पार पडणार होतं. परंतु, लग्नाआधीच त्यांनी आत्महत्या केल्यानं सर्वच ठिकाणी शोककला पसरली आहे.
हे ही वाचा >> Suresh Dhas: "...त्यांनासुद्धा मोक्का लागला पाहिजे", आष्टीच्या कार्यक्रमात सुरेश धसांची CM फडणवीसांकडे मोठी मागणी
आत्महत्येच्या घटनेमुळे देहूगावात शोक व्यक्त केला जात आहे. देहूरोड पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरीष महाराज त्यांच्या रुममध्ये झोपले होते. सकाळी त्यांना उठवण्यासाठी लोकं गेली, त्यावेळी त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर कुटुंबातील लोकांनी दरवाजा तोडला. त्यावेळी शिरीष महाराजांनी आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
हे ही वाचा >> Pranit More Solapur : प्रणित मोरेला मारहाण का झाली? सोलापुरातील घटनेवर अभिनेता वीर पहारिया काय म्हणाला?
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी वाहिली श्रद्धांजली
तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीटरवर म्हटलंय की, "संत तुकाराम महाराजांच्या वंशजांच्या निधनाचे वृत्त क्लेशदायक! जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह. भ. प. श्री शिरीष महाराज मोरे (देहूकर) यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद असे आहे. ते प्रसिद्ध शिवव्याख्याते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष होते आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा चाहता वर्ग आहे. समाजजागृतीसाठी त्यांचे दिलेले योगदान आणि प्रभावी विचारसरणी सदैव स्मरणात राहील. मोरे कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ह. भ. प. शिरीष महाराज मोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!"
ADVERTISEMENT











