Suresh Dhas: "...त्यांनासुद्धा मोक्का लागला पाहिजे", आष्टीच्या कार्यक्रमात सुरेश धसांची CM फडणवीसांकडे मोठी मागणी

मुंबई तक

Suresh Dhas On Santosh Deshmukh Murder Case:  बीड जिल्ह्याचे मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी अनेक धक्कादायक माहिती समोर आणणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा खळबळजनक विधान केलं आहे.

ADVERTISEMENT

Suresh Dhas On CM Devendra Fadnavis
Suresh Dhas On CM Devendra Fadnavis
social share
google news

बातम्या हायलाइट

point

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धसांचं खळबळजनक विधान!

point

"मुख्यमंत्री साहेब अजून वाळू, राख, भूमाफिया..."

point

आमदार सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

Suresh Dhas On Santosh Deshmukh Murder Case:  बीड जिल्ह्याचे मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी अनेक धक्कादायक माहिती समोर आणणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा खळबळजनक विधान केलं आहे. "साहेब आपण संतोष देशमुख खून प्रकरणात कणखर भूमिका घेतली. तुम्ही म्हणाले होते ना..मी कुणालाच सोडणार नाही, त्यावर सर्व जनतेचा विश्वास आहे. मुख्यमंत्री साहेब अजून वाळू, राख, भूमाफिया यांनासुद्धा मोक्का लागला पाहिजे, अशी आमची विनंती आहे. तुम्ही ते लावाल ही आमची खात्री आहे", असं म्हणत सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली. सुरेश धस आष्टी येथील कार्यक्रमात बोलत होते.

सुरेश धस पुढे म्हणाले, "माझं परमभाग्य आहे, सर्व मतदारसंघाच्या समोर सांगतो, 1999 ते 2004 हे पाच वर्ष साहेबांच्या कागदांचा बॉक्स खालून वर काढून द्यायचं काम मी करायचो. मी फार छोटा माणूस आहे. गंगाधरराव फडणवीस साहेब तरी एमएलसी होते. माझा बाप ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा झाला नाही. तरी तुम्ही मला शेजारी बसवून घेतलं, यासाठी मी तुमचं मनापासून आभार मानतो. 2019 पासून माझ्यावर, माझ्या कुटुंबावर कटकारस्थाने करून वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा काम झाला. परंतु, तुम्ही माझ्या पाठीमागे दत्त म्हणून राहिलात. हे सुद्धा सर्व लोकांना याठिकाणी सांगतो".

हे ही वाचा >> Pranit More Solapur : प्रणित मोरेला मारहाण का झाली? सोलापुरातील घटनेवर अभिनेता वीर पहारिया काय म्हणाला?

"काही लोक म्हणतात बीड जिल्ह्याची बदनामी होते. पण साहेब या जिल्ह्याने क्रांतीसिंह नाना पाटलांना निवडून दिलं. या जिल्ह्याने रखमाजी पाटील गावडेंना निवडून दिलं. धनगर समाजाचे होते ते..त्यांना या जिल्ह्याने निवडून दिलं. केशरकाकू क्षीरसागर यांना या जिल्ह्याने निवडून दिलं. या जिल्ह्याने बबनराव ढाकणे साहेबांना निवडून दिलं. या जिल्ह्याने प्रमोद महाजन एवढ्या उंचीचा माणूस दिला आणि गोपीनाथराव मुंडेंसाहेबांसारखा पहाडाएवढा नेता या जिल्ह्याने  दिला. शाहुराव पाटील, माधवराव पवार, सुंदरराव सोळंखे, शिवाजीराव पंडित दादा..हे आजही आम्हाला पाया पडायला छत्र शिल्लक आहे. विमलताई मुंधडा सुद्धा याच जिल्ह्याने नेत्या दिल्या. अशा अनेक राजकारण्यांची जडणघडण याठिकाणी झाली. काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी वृत्तीला पाठिंबा दिल्यानं जिल्ह्याची प्रतिम मलिन झाली होती", असंही सुरेश धस म्हणाले.

हे ही वाचा >> Rahul Solapurkar : "दिलगिरी सुद्धा नशा करुन मागितली, गुन्हा दाखल झाला पाहिजे", अंधारे, मिटकरी आक्रमक

साहेब मला चांगलं आठवतंय, 2019 मध्ये पूर्ण बहुमत येऊनसुद्धा तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झाला नाहीत. जनादेश तुमच्या बाजूनं होता पण पहाटेच आमचा जनादेश चोरून नेला. तेव्हा ज्याप्रकारणे आपल्यावर राजकीय आणि कौंटुबिक जीवनातून उध्वस्त करण्याची कट कारस्थानं रचली गेली, परंतु आपण कुशाग्र बुद्धीने जो संघर्ष केला, त्याला तोडच नाही. त्यावर मात केली आपण. त्याला बिनजोड पैलवान म्हणतात, तो बिनजोड पैलवान आहेत तुम्ही..असं म्हणत धस यांनी फडणवीसांचं कौतुक केलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp