satara crime : सातारा जिल्ह्यातील सासपडे गावात मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने डोक्यात जातं घालून निर्घृण हत्या केली आहे. या घटनेनं सातारा जिल्हा हादरून गेला आहे. या घटनेनं नागरिकांच्यात संतापाची भावना उसळली आहे. या प्रकरणात मुलीच्या खुनाप्रकरणी तिच्याच घरालगत राहणाऱ्या तरुणाला संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या हल्ल्यानंतर गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. संशयित आरोपीचं नाव राहुल यादव (वय 35) असे आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : युतीधर्म मोडला म्हणून एकनाथ शिंदेंनी पक्षातून हकालपट्टी केली, तेच महेश गायकवाड भाजपच्या वाटेवर?
या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. काही तासानंतर संशयित आरोपी राहुल यादवच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेनं स्थानिकांच्या मनात संतापाची लाट उसळली आहे. स्थानिकांनी नराधमाच्या घरावर दगडफेक करत पत्रे उचकटले. यामुळे सासपडे गावातीला वातावरण चिघळल्याचं दिसून येत आहे.
शाळकरी मुलीच्या डोक्यात जातं घालत संपवलं
या प्रकरणात राहुल यादवने पोलिसांकडे कबुली जबाब देताना शाळकरी मुलीचा खून केल्याचं मान्य केलं. शाळेतून आल्यानंतर तिने कुटुंबियांकडून चावी घेतली आणि ती घरात गेली. त्यानंतर ती कपडे बदलत होती, तेव्हा राहुलने घरात कोणीही नसल्याचं पाहून तो घरात शिरला. त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. पण, तिने राहुलला विरोध दर्शवला. त्यानंतर तिच्या डोक्यात जात्याने हल्ला केल्याची माहिती राहुलने पोलिसांना दिली आहे.
हे ही वाचा : बीड : शेतीच्या बांधावरुन वाद, तीन पुतणे अन् सुना एकत्र आल्या, चुलत्याला कोयत्याने वार करुन संपवलं
राहुल यादवच्या मोबाईल हिस्ट्रीतून धक्कादायक माहिती समोर
याचप्रकरणी आता पोलिसांचं एक पथक राहुल यादवची झाडाझडती घेत आहेत. दुसरे पोलिसांचे पथक हे त्याचा मोबाईल स्कॅन करत तांत्रिक माहिती घेत आहेत. राहुल यादवच्या मोबाईलमधून धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. मोबाईल हिस्ट्रीतून त्याला अश्लील व्हिडिओ बघण्याचा नाद असल्याचं समोर आलं.
ADVERTISEMENT
