फलटणमधील धुमाळवाडीत पावसाचा हाहाकार, पूल वाहून गेला, रस्ताही पाण्यात, 35 गावांचा संपर्क तुटला

साताऱ्यातील फलटण तालुक्यात असणाऱ्या या गावात अनपेक्षित पावसानं शेती आणि फळबागांना प्रचंड नुकसान झालं आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले की, गेल्या 50 वर्षांत उन्हाळ्यात असा पाऊस प्रथमच पाहिला आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

• 02:05 PM • 25 May 2025

follow google news

Satara Phaltan Dhumalwadi Rain : यंदा राज्यात पावसाचं आगमन लवकर झालंय. मात्र, या पावसानं राज्यातील अनेक भागांना झोडपून काढलंय. देशभरात फळांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेले धुमाळवाडी आज अभूतपूर्व नैसर्गिक आपत्तीच्या विळख्यात सापडले आहे. ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली झाली. गावाजवळचा पूल वाहून गेल्यानं धुमाळवाडीसह जवळपास 35 गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> दोन गाड्या, दोन पिस्तूल, चांदीची भांडी... वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

साताऱ्यातील फलटण तालुक्यात असणाऱ्या या गावात अनपेक्षित पावसानं शेती आणि फळबागांना प्रचंड नुकसान झालं आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले की, गेल्या 50 वर्षांत उन्हाळ्यात असा पाऊस प्रथमच पाहिला आहे.

संपूर्ण शेती जलमय झाली असून, अनेक फळझाडे उन्मळून पडली आहेत. एकीकडे दुष्काळी परिस्थितीने त्रस्त असलेला हा भाग आता या अचानक आलेल्या संकटामुळे पूर्णपणे हतबल झाला आहे.

हे ही वाचा >> लेकानं आईशी ठेवले अनैतिक संबंध, लेकीनं पाहताच बापानं...

शेतकरी रामदास पाटील यांनी सांगितले, “आमच्या फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. हा पाऊस आमच्यासाठी काळ बनून आला आहे.” प्रशासनाकडून अद्याप मदतकार्य सुरू झाले असले तरी, संपर्क तुटल्याने बचावकार्याला अडथळे येत आहेत. शेतकऱ्यांनी तातडीने मदत आणि नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

दरम्यान. हवामान खात्याने पुढील 24 तासांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. या संकटामुळे धुमाळवाडी आणि परिसरातील शेतकऱ्यांचे भवितव्य अंधारात आहे.

 

    follow whatsapp