सोलापुरात प्रियकराने साथ सोडून लग्नाचा निर्णय घेतला, नैराश्यात गेलेल्या तृतीयपंथीयाने ओढणीने गळफास घेत आयुष्य संपवलं

solapur news : सोलापूर शहरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. प्रेमभंगाच्या वेदनेतून तृतीयपंथीयाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

solapur news transgender man commits suicide

solapur news transgender man commits suicide

मुंबई तक

04 Dec 2025 (अपडेटेड: 04 Dec 2025, 07:03 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सोलापूर शहर हादरलं

point

तृतीयपंथीयाने प्रेमसंबंधातून आपलं जीवन संपवलं

solapur news : विजय बाबर - सोलापूर शहरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. प्रेमभंगातून तृतीयपंथीयाने आपलं जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार आज (4 डिसेंबर) रोजी सकाळी उघडकीस आला. या प्रकरणात प्रकाश व्यंकप्पा कोळी (वय 22), रा.साईनगर, बाळे, सोलापूर असे तृतीयपंथीयाचे नाव आहे. त्याने घरातील ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत जीवन संपवल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : यवतमाळ हादरलं! पत्नीसोबत ठेवले अनैतिक प्रेमसंबंध, संतापलेल्या नवऱ्याने लाकडी दांड्याने हल्ला करत प्रियकराला संपवलं

...म्हणून त्याने टोकाचा निर्णय घेतला

या घटनेनंतर कुटुंबियांनी प्रकाशला तत्काळ शासकीय सिव्हिल रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, रुग्णालयात पाठण्यापूर्वीच प्रकाशचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. ही बातमी कळताच रुग्णालयात मोठ्या संख्येने तृतीयपंथीयांचा जमाव जमला. मृताची बहिण ज्योती कोळी म्हणाली, “प्रकाश आतून खूप तुटला होता. प्रकाश ज्याच्यावर प्रेम करत होता त्या व्यक्तीचं अचानक लग्न ठरलं… त्यानं प्रकाशकडे पाठ फिरवल्यानं तो पूर्णपणे खचल्याने त्याने हा टोकाचा निर्णय घेतला.”

कुटुंबियांनी सांगितलं मन हेलावणारं कारण 

कुटुंबीयांच्या मते, दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरु होते. मात्र, प्रियकराने लग्नाचा निर्णय घेतल्याने प्रकाशच्या भावना दुखावल्या आहेत. नातेवाईकांनी हेही सांगितले की, प्रकाशने जीवन संपवण्यापूर्वी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला असल्याची माहितीही समोर आली आहे.

हे ही वाचा : मुलीच्या प्रकरणावरून मुलाला उलटं टागलं, नंतर गळा चिरून केली हत्या, अल्पवयीन मुलाचं धक्कादायक कांड

तृतीयपंथीय समुदायाच्या भावनात्मक असुरक्षिततेचा प्रश्न समोर

समाजात स्वतःची ओळख जपण्यासाठी सतत संघर्ष करणाऱ्या तृतीयपंथीयाचे हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे. प्रेमात आधाराची गरज प्रत्येकाला असते. या घटनेनं पुन्हा एकदा तृतीयपंथीय समुदायाच्या भावनात्मक असुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

    follow whatsapp