काय? कुत्र्यासारखा दिसणारा साप, व्हिडिओ पाहून डोकं चक्रावेल

मुंबई तक

• 04:54 PM • 07 Nov 2023

दुर्मिळ प्रजातीचा म्हणजेच कुत्र्यासारखा दिसणारा साप ठाण्यासारख्या गजबजलेल्या शहराता सापडल्याने अनेकांनी याचे आश्चर्य व्यक्त केले आहे. हे साप साधारणपणे किनारी भागात किंवा समुद्रात आढळतात. कारण हे साप फार कमी वेळ जमिनीवर राहत असतात.

thane in hotel dog faced water snake found near

thane in hotel dog faced water snake found near

follow google news

Viral News: मुंबईमध्ये विचित्र घटना घडली आहे. मुंबईतील ठाण्यातील (Thane) एका हॉटेलमध्ये कुत्र्यासारखा साप (Dog Faced Snake) सापडला आहे. हे वाचताना तुम्हाला वेगळं वाटेल पण हे अगदी खरं आहे. ठाण्यातील एका हॉटेलजवळ हा दुर्मिळ प्रजातीचा साप सापडला आहे. वन्यजीव कल्याण संस्थेच्या एका अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, ठाण्यातील एका हॉटेलजवळ पाण्यातील सापाची सुटका करण्यात आली. त्याचे तोंड अगदी कुत्र्यासारखे होते. दुरून पाहिल्यास हा साप तुम्हाला साप वाटणार नाही. मात्र तुम्ही जवळ जाऊन पाहिल्यास त्याच सापाचे तोंड हे कुत्र्यासारखे दिसत होते.

हे वाचलं का?

गजबजलेल्या रस्त्यावर साप

रेसिंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेलफेअरचे संस्थापक पवन शर्मा यांनी सांगितले की, रविवारी रात्री गजबजलेल्या रस्त्यावरून या कमी विषारी सापाची सुटका करण्यात आली. डॉ. प्रीती साठे यांनी त्यांची तपासणी केली असता त्याची प्रकृतीही चांगली असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा >> दोन दिवसांपासून खोली बंद, दरवाजा उघडताच सगळेच हादरले, पुण्यात नेमकं घडलं काय?

दुर्मिळ प्रजातीचा साप

तज्ज्ञांच्या मते हा दुर्मिळ प्रजातीचा साप असून शहरात त्याचा शोध लागणे ही कठीण गोष्ट आहे. हे साप साधारणपणे किनारी भागात किंवा समुद्रात आढळतात. कारण हे साप फार कमी वेळ जमिनीवर राहत असतात. मासे पकडण्याच्या नादात हा हा साप जाळ्यात अडकल्याचेही यावेळी सांगितले.

सॉल्ट कोब्रा

सापडलेल्या सापाला दक्षिण आशियाई बोकडम असंही म्हणतात. या सापाला नंतर नैसर्गिक अधिवासात म्हणजेच पाण्यात सोडण्यात आले. मागील वर्षाच्या सुरुवातीला विशाखापट्टणम येथील साप पकडणाऱ्या किरणने कुत्र्याचे तोंड असलेल्या पाण्यातील साप Cerberus rhynchops पकडला होता. तिथे त्याला ‘उप्पू त्रासू’ किंवा सॉल्ट कोब्रा म्हणतात. तो साप एका झाडाच्या आतल्या गलिच्छ तलावात सापडला होता. सापडलेला हा दुर्मिळ प्रजातीचा साप शहरामध्ये सापडणे अगदी दुर्मिळ घटना आहे. या प्रकारचे साप हे किनारी पट्ट्यात आणि समुद्रात आढळत असतात. त्यांना जमिनीवर वावरायला अजिबात आवडत नाहीत.

    follow whatsapp