जगातील सर्वात मोठी चोरी! तब्बल 40 अब्ज रुपयांच्या सामानाची चोरी, 'इतक्या' कोटी डॉलर्सचं बक्षीस अन्...

1990 मध्ये बोस्टन येथील Isabella Stewart Gardner Museum मध्ये 13 मौल्यवान कलाकृतींची चोरी झाली होती. आज सुद्धा या चोरी झालेल्या कलाकृतींबाबत कोणताच पुरावा हाती लागला नाही. या प्रकरणासंदर्भात सविस्तर जाणून घेऊया.

तब्बल 40 अब्ज रुपयांच्या सामानाची चोरी!

तब्बल 40 अब्ज रुपयांच्या सामानाची चोरी! (फोटो सौजन्य: Grok AI)

मुंबई तक

• 07:00 AM • 29 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

जगातील सर्वात मोठी चोरी कधी झाली?

point

तब्बल 40 अब्ज रुपयांच्या सामानाची चोरी!

point

'इतक्या' कोटी डॉलर्सचं बक्षीस अन्...

Viral News: 18 मार्च 1990 रोजी बोस्टन येथील इसाबेला स्टीवर्ट गार्डनर म्यूझियम मध्ये झालेल्या चोरीमुळे अमेरिकेसह संपूर्ण जग हादरून गेलं होतं. 1990 मध्ये बोस्टन येथील  Isabella Stewart Gardner Museum मध्ये 13 मौल्यवान कलाकृतींची चोरी झाली होती. ही घटना केवळ एक सामान्य चोरी नव्हे तर हे प्रकरण अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी कला चोरी आणि मालमत्ता गुन्हे (property crime) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. आज सुद्धा या चोरी झालेल्या कलाकृतींबाबत कोणताच पुरावा हाती लागला नाही. या प्रकरणासंदर्भात सविस्तर जाणून घेऊया. 

हे वाचलं का?

18 मार्च 1990 रोजी मध्यरात्री दोन लोक पोलिसांची वर्दी घालून संग्रहालयाच्या दरवाजाजवळ पोहोचले. आरोपींनी एका गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आल्याचं तिथे ड्यूटीवर तैनात असलेल्या सिक्योरिटी गार्ड्सना सांगितलं. गार्ड्सनी सुद्धा कोणतीही शंका न बाळगता संग्रहालयाचा दरवाजा उघडला आणि तीच त्यांची मोठी चूक ठरली. 

अब्ज डॉलर्सच्या कलाकृतींची चोरी...

आत येताच बनावट पोलीस कर्मचाऱ्यांनी गार्ड्सना हातकड्या घालून बेसमेन्टमध्ये बंदिस्त केलं. त्यानंतर ते संग्रहालयात आरामात फिरत होते. पुढील 81 मिनिटे दोन्ही चोर संग्रहालयात फिरत होते आणि तिथले मौल्यवान पेन्टिंग्स आणि कलाकृती खाली उतरवत होते. अशा पद्धतीने त्यांनी एकूण 13 कलाकृती चोरल्या, ज्यांची किंमत आज सुद्धा अब्जावधी डॉलर्स असल्याचा अंदाज आहे. यामध्ये जगातील प्रसिद्ध कलाकरांच्या कलाकृतींचा समावेश आहे. 

  • डच कलाकार रेम्ब्रांटची The Storm on the Sea of Galilee (त्यांची एकमेव समुद्री दृश्याचं पेन्टिंग)
  • रेम्ब्रांट यांची  A Lady and Gentleman in Black
  • कलाकार वर्मी यांची The Concert (चोरी झालेली जगातील सर्वात महागडी पेन्टिंग) 
  • डिगा यांच्या काही कलाकृती
  • मानेट यांची Chez Tortoni कलाकृती
  • अशा इतर मौल्यवान कृलाकृती

आश्चर्याची बाब म्हणजे संग्रहालयात इतर महागड्या कलाकृती असून देखील चोरांनी अशा काही मोजक्याच कलाकृती चोरण्यासाठी निवडल्या. सकाळी स्टाफने सगळ्या गार्ड्सना बेसमेंटमध्ये बंदिस्त अवस्थेत पाहिलं, तेव्हा या चोरीचा खुलासा झाला. एफबीआय आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. प्राथमिक तपासावरून हे काम एका संघटित गँगचं असून, त्यांना संग्रहालयाच्या सुरक्षा व्यवस्था आणि अंतर्गत नकाशाची माहिती असल्याचं समोर आलं. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: CSMT ते ठाणे दरम्यान मेट्रो सुरू होणार... मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा! तारीख सुद्धा ठरली?

अद्याप चोरांचा शोध लागला नाही

आज सुद्धा संग्रहालयात या फ्रेम्स खाली पडल्याचं दिसून येत आहे. एक बॉक्स कटर आणि रेझर चाकूच्या मदतीने फ्रेम्स कापल्या गेल्या असल्याचं समोर आलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुमारे 81 मिनिटे चोर म्यूझियमच्या आत फिरत होते. त्यावेळी, त्यांनी ब्लू रूम, डच रूम आणि शार्ट गॅलरीमध्ये सुद्धा वेळ घालवला. FBI च्या मते, स्थानिक दरोडेखोरांच्या एका गटाने ही चोरी केली होती. नंतर त्यांनी या कलाकृती न्यू इंग्लंडहून कनेक्टिकटला हलवल्या आणि 200 मध्ये त्या फिलाडेल्फिया परिसरात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या. या चोरीसंबंधी FBI ने जबाबात सांगितलं की आज सुद्धा या चोरीच्या प्रकरणाकडे लक्ष दिलं जात आहे. 

हे ही वाचा: Govt Job: 'इंजिनीअरिंग'चं शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी मिळवा सरकारी नोकरी! कसं ते सविस्तर जाणून घ्या

1 कोटी डॉलर्सचं बक्षीस

बरीच वर्षे या प्रकरणाचा तपास सुरू राहिला. माफिया टोळ्यांपासून ते आंतरराष्ट्रीय कला तस्करी करणाऱ्या सर्वांची चौकशी करण्यात आली, परंतु चोरीला गेलेली पेन्टिंग्स अद्याप सापडली नाहीत. 2013 मध्ये, एफबीआयने त्यांना चोरीमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांच्या ओळखीचे संकेत मिळाले आहेत, परंतु पुराव्याअभावी अटक करण्यात आली नसल्याचं अधिकृतपणे कबूल केलं. आज 30 वर्षांहून अधिक काळ झाला असून देखील Isabella Stewart Gardner Museum Heist संग्रहालयातील चोरीचे रहस्य अद्याप उलगडलेलं नाही. जर कोणी या कलाकृती परत केल्या तर त्याला 10 मिलिअन डॉलर्स म्हणजेच 1 कोटी डॉलर्सचे बक्षीस मिळणार असल्याची घोषणा संग्रहालयाच्या प्रशासनाने केली. 

    follow whatsapp