राज्यात पश्चिम महाराष्ट्रासह 'या' विभागांवर अवकाळी पावसाचं संकट

Maharashtra Weather : राज्यात वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. काही ठिकाणी दुहेरी वातावरणाची शक्यता आहे, तसेच काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता जारी करण्यात आली. जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात ऊन तर कुठे पाऊस.

Maharashtra weather

Maharashtra weather

मुंबई तक

• 06:00 AM • 18 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात वातावरणात सातत्याने बदल

point

जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात ऊन तर कुठे पाऊस

Maharashtra Weather : राज्यात वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. काही ठिकाणी दुहेरी वातावरणाची शक्यता आहे, तसेच काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता जारी करण्यात आली. कोकण विभागात प्रामुख्याने ठाणे आणि रायगड जिल्ह्यातच अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. 18 मे 2026 रोजी काही ठिकाणी उष्णता तर कुठे अवकाळी पावसाचं सावट असल्याचा हवामान विभागाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पुण्याची गोष्ट : पुणेकरांसाठी खुशखबर, 165 कोटींचं उभारलं कॅन्सर रुग्णालय

कोकणसह मुंबईचं वातावरण कसं राहील? 

कोकण विभागात प्रामुख्याने पालघर आणि मुंबई या दोन जिल्ह्यांना हवामान कोरडं राहील अशी शक्यता वर्तवली आहे. तसेच याच विभागात ठाणे आणि रायगड जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर दुसरीकडे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली आहे. 

 हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना या दोन जिल्ह्यांना हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच बीड, नांदेड या जिल्ह्यात हलका ते मध्यम पावासाची शक्यता आहे. दरम्यान नांदेड आणि बी़ड या दोन जिल्ह्यांना हवामान विभागाने हलका ते मध्यम पावसाच्या इशाऱ्याचा अंदाज वर्तवला आहे. 

हे ही वाचा : बापाच्या रिसॉर्टवर बोलावून 17 वर्षीय मुलीवर नको तेच, धनिकपुत्राचं मोठं कांड

पश्चिम महाराष्ट्रात अवकाळीचं सावट 

तसेच विदर्भातील नागपूर, अमरावती आणि अमरावती या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळी पावासाचा अंदाज वर्तवला आहे.