Pune Drugs : तरुणी ट्रग्जच्या नशेत..., पुण्यातील व्हिडीओने राज्यात खळबळ

मुंबई तक

25 Feb 2024 (अपडेटेड: 25 Feb 2024, 01:38 PM)

Pune Crime News : पुण्यातील दोन तरुणींचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अभिनेता रमेश परदेशीने ही घटना समोर आणली आहे.

पुण्यातील दोन तरुणींचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

actor ramesh pardeshi's video goes viral

follow google news

Pune Drugs Crime News : पुण्यात कोट्यवधी रुपयांचा ड्रग्जचा साठा पकडण्यात आल्याची चर्चा होत असतानाच एका नव्या व्हिडीओ खळबळ उडाली आहे. ड्रग्ज घेऊन नशेत तर्रर्रर्र झालेल्या दोन कॉलेजवयीन तरुणींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, एकच खळबळ उाडील आहे. अभिनेता रमेश परदेसीने नशेत टुल्ल झालेल्या तरुणींचा व्हिडीओ केला आहे. 

हे वाचलं का?

पुणे सध्या चर्चेत आहे, ते ड्रग्जचा मोठा साठा सापडल्यामुळे. शहरात तब्बल ११ कोटी रुपयांचे ६०० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. मिठाच्या पिशव्यांमध्ये हे ड्रग्ज भरलेले होते. या घटनेवर चिंता व्यक्त होत असतानाच एक नवीन घटना समोर आली आहे. 

पुण्यातील व्हायरल व्हिडीओत काय?

अभिनेता रमेश परदेसी यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.  व्हिडीओत दोन तरुणी दिसत आहे. एक तरुणी नशेत दिसत आहे. ती काहीतर बोलण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरी तरुणी तिच्या बाजूला पडलेली आहे. अति नशा केल्यामुळे ती पूर्णपणे शुद्ध हरपून गेल्याचे दिसत आहे. 

परदेसी म्हणताहेत की,  'वेताळ टेकडीवर आम्ही धावायला आलो होतो. इथं महाविद्यालयात पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या दोन तरुणी बियर, दारू आणि नशेचं काहीतरी घेऊन टेकडीवर कोपऱ्यात पडल्या होत्या. या तरुणींना आम्ही सुरक्षित ठिकाणी घेऊन आलो. हे यासाठी सांगतोय कारण पुण्यात दोन दिवसांपूर्वी ड्रग्ज सापडलं आहे.'

पुणे नशेचं माहेरघर बनतंय का?

पुणे शहराचा औद्योगिकीकरणामुळे मोठा विस्तार झाला आहे. स्थलांतरित आणि इतर भागातून लोक इथं स्थायिक झाल्यामुळे पुणे शहर अमर्याद वाढलं आहे. शिक्षणाचं माहेरघर म्हणून पुण्याची राज्यात ओळख आहे, त्यामुळे राज्याच्या विविध भागातून आणि इतर राज्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. मात्र, आता विद्यार्थीही नशेच्या आहारी जाताना दिसत असून, शिक्षणाचं माहेरघर नशेचं माहेरघर बनतंय का? अशी चर्चा सुरू झाली आहे. 

    follow whatsapp