Viral News : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओने लोकंच चक्रावून गेले आहेत. संबंधित व्हिडिओत एक तरुण आपल्याच गळ्यात जिवंत साप टाकून स्कूटी चालवताना दिसून आला. आश्चर्याची बाब म्हणजे अशी की, तरुण केवळ सापासोबत खेळतच नव्हता की, त्याने अनेकदा सापाचा मुका देखील घेतला होता. हे वाचून तुम्हाला हसू येईल, तर काहींना चिड देखील येईल, पण हे सत्य आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'मी जात पात पाहिली नाही... जरांगेंना धनंजय मुंडेंच पृथ्वी तलावर नकोत', मुंडेंचा जरांगेंवर पलटवार
व्हिडिओत नेमकं काय?
संबंधित व्हिडिओ हा नागपूर येथील अवस्थी चौकातील असल्याचं बोललं जातंय. त्या गाडीवरील नंबर हा नागपूरातील असल्याचे बोलले जातंय. ही घटना बुधवारी शनिवारी पाच वाजता घडली आहे. व्हिडिओत स्पष्टपणे दिसून येत आहे की, तरुण एक एक्टिवा स्कूटी चालवत आहे आणि त्याच्यामागे दुसरा व्यक्ती बसलेला दिसत आहे. याचदरम्यान, तो कॅमेऱ्यात बघून सापाला आपल्यात हातात घेता आणि त्याचा किस घेताना दिसून येत आहे.
स्टंटबाजी आणि वन्यजीवांसोबत खेळ
व्हिडिओत पाहू शकता की, मागून येणाऱ्या टुव्हिलरवर एक मुलगा व्हिडिओ शूट करत आहे. रस्त्यावरील ही स्टंटबाजी आणि वन्यजीवांसोबत असा खेळ केल्याने लोकांमध्ये नाराजीचा सूर आहे. संबंधित प्रकरणातच व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर वन विभाग आणि पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली होती. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हे कृत्य वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन करते. कोणत्याही वन्य प्राण्याला किंवा सापाला पकडणे, त्यांच्याशी गैरवर्तन करणे आणि सार्वजनिकरित्या प्रदर्शित करणे हा फौजदारी गुन्हा आहे.
हे ही वाचा : मनोज जरांगेंनी सांगितला हत्येचा कट, भाऊबीज दिवशी 2.50 कोटींची दिली सुपारी, मारण्याचे तीन प्लॅन
नागपूर पोलिसांनी सांगितलं की, व्हिडिओची सत्यता तपासली जात आहे आणि तरुणाची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरु आहे. जर व्हिडिओ खरा असल्यास संबंधित तरुणावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल.
ADVERTISEMENT











