'मी जात पात पाहिली नाही... जरांगेंना धनंजय मुंडेंच पृथ्वी तलावर नकोत', मुंडेंचा जरांगेंवर पलटवार

मुंबई तक

Dhananjay Munde : मनोज जरांगेंच्या दाव्यानंतर आमदार धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मनोज जरांगेंनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

ADVERTISEMENT

Dhananjay Munde
Dhananjay Munde
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंडेंनी मनोज जरांगेचे आरोप धनंजय फेटाळले

point

'धनंजय मुंडे हेच या पृथ्वी तलावर नकोत'

Dhananjay Munde : मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत धक्कादायक दावा केला आहे. आमदार धनंजय मुंडे यांनीच माझ्या हत्येचा कट रचल्याचं ते म्हणाले. या वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा होऊ लागली आहे. माझ्या हत्येसाठी 2.50 कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. भाऊबीज दिवशीच मला मारण्याचा प्लॅन असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर आता धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेत आरोप फेटाळून लावले आहेत. 

हे ही वाचा : मोठी बातमी! लेकाचा अठराशे कोटींचा जमीन घोटाळा, अजितदादा देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, नेमकी चर्चा काय?

 मुंडेंनी मनोज जरांगेचे आरोप धनंजय फेटाळले

धनंजय मुंडे म्हणाले की, 'मी गेली 30 वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करतो. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि अण्णांनी कधीही जात-पात न बघता काम केले होते', असं म्हणत त्यांनी मनोज जरांगेंच्या आरोपावर उत्तर दिलं आहे. त्यानंतर त्यांनी मराठा समाजासाठी केलेल्या कामांचा दाखला दिला. '5 वर्षे विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना, मी मराठा आरक्षणासाठी सभागृह बंद केले होते. नगर जिल्ह्यातील कोपर्डी प्रकरणात मी भेट दिली आणि आरोपीला अटक होईपर्यंत मी सभागृह चालू दिले नाही', असं म्हणत त्यांनी मराठा समाजासाठी केलेल्या कामाचा दाखला दिला. 

'धनंजय मुंडे हेच या पृथ्वी तलावर नकोत'

त्यानंतर त्यांनी बीड जिल्ह्यात 80 हजार कुणबी प्रमाणपत्र वाटले होते, मी मनोज जरांगेंचं उपोषणही सोडले होते. 17 तारखेच्या सभेत मी त्यांच्यावर बोललो असेल पण, त्यांच्यावर त्यानंतर मी कधीही बोललो नाही. मनोज जरांगेंना वाटतं की, धनंजय मुंडे हेच या पृथ्वी तलावर नकोत. 

हे ही वाचा : मनोज जरांगेंनी सांगितला हत्येचा कट, भाऊबीज दिवशी 2.50 कोटींची दिली सुपारी, मारण्याचे तीन प्लॅन

 

मराठा समाजाला इडब्ल्यूएसमधून आरक्षण दिलेलं आहे, याचे उत्तर जरांगे पाटील यांनी का दिले नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या पद्धत लोक विसरत चालली आहेत, आपल्याला ही घडी पुन्हा बसवायची असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. 
 

हे वाचलं का?

    follow whatsapp