मोठी बातमी! लेकाचा अठराशे कोटींचा जमीन घोटाळा, अजितदादा देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, नेमकी चर्चा काय?

मुंबई तक

Parth Pawar Land Scam : राज्याच्या राजकारणात एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्याचे सांगण्यात येत आहे. अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्यावर जमीन घोट्याळ्याचे आरोप झाले होते. या भेटीला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

ADVERTISEMENT

Parth Pawar Land Scam
Parth Pawar Land Scam
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अजितदादा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

point

300 कोटींचे व्यवहार होत असून माहिती कसं नाही?

point

थोडक्यात प्रकरण 

Parth Pawar Land Scam : राज्याच्या राजकारणात एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्याचे सांगण्यात येत आहे. अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्यावर जमीन घोट्याळ्याचे आरोप झाले होते. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात एक वेगळीच चर्चा निर्माण झाली आहे. या भेटीदरम्यान दोघांमध्ये काय बोलणं होईल याकडे आता अनेकांच्या नजरा आहेत. या भेटीला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी आणि विरोधकांकडून राजीनाम्याची मागणीने जोर धरला आहे. 

हे ही वाचा :  पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याचं अजितदादांच्या सासरवाडीशी कनेक्शन, दिग्विजय पाटील आणि सुनेत्रा पवारांचं नातं काय?

अजितदादा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

अशातच आता अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. जमीन घोटाळ्यातील प्रकरणात अजित पवारांवर देखील गंभीरपणे आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, अंजली दमानिया, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. याचपार्श्वभूमीवर आता अजितदादांनी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी गेलेत. 

300 कोटींचे व्यवहार होत असून माहिती कसं नाही?

संबंधित प्रकरणात आपल्याला यातील काहीही माहिती नसल्याचे ते म्हणाले होते. मुलाने काय केलं माहिती नसून हे प्रकरण त्यांनी आपल्याच मुलावर ढकलून दिलं आहे. अशातच आपल्यात घरात 300 कोटींचे व्यवहार होत असून माहिती कसं नाही? असा प्रश्न आता विरोधकांनी केला आहे. अशातच अजितदादांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीने जोर धरला आहे. 

थोडक्यात प्रकरण 

1800 कोटी रुपयांची जमीन ही केवळ 300 कोटी रुपयांना विकत घेतल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. एवढंच नाहीतर त्याला केवळ 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी लाव  महत्त्वाचं म्हणजे पार्थ पवारांनी कोरेगाव पार्कात आयटी पार्थ आणि डेटा सेंटरची देखील उभारणीबाबत देखील काम सुरु होते. 

हे वाचलं का?

    follow whatsapp