पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याचं अजितदादांच्या सासरवाडीशी कनेक्शन, दिग्विजय पाटील आणि सुनेत्रा पवारांचं नातं काय?

मुंबई तक

अमेडिया या कंपनीच्या घोटाळा प्रकरणात पार्थ पवार यांच्या नातेवाईकाचा थेट सहभाग समोर आल्यामुळे आता दिग्विजय पाटील यांच्या आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र तपासणी सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे.

ADVERTISEMENT

दिग्विजय पाटील आणि सुनेत्रा पवारांचं नातं काय?
दिग्विजय पाटील आणि सुनेत्रा पवारांचं नातं काय?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याचं अजितदादांच्या सासरवाडीशी कनेक्शन

point

दिग्विजय पाटील आणि सुनेत्रा पवारांचं नातं काय?

गणेश जाधव, धाराशिव: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया या कंपनीचा जमीन घोटाळा समोर आल्यानंतर आता या प्रकरणात धाराशिव कनेक्शन देखील उजेडात आले आहे. अमेडिया कंपनीत पार्थ पवार यांच्यासोबत भागीदारी करणारे दिग्विजय पाटील हे राज्यसभा सदस्य सुनेत्रा पवार यांचे भाचे असल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणात पार्थ पवार यांच्या नातेवाईकाचा थेट सहभाग समोर आल्यामुळे आता दिग्विजय पाटील यांच्या आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र तपासणी सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे.

कोण आहेत दिग्विजय पाटील 

दिग्विजय हे सुनेत्रा पवार यांचे बंधु अमरसिंह पाटील यांचे पुत्र आहेत.अमरसिंह पाटील आणि सुनेत्रा पवार हे माजी मंत्री डॉ. पदमसिंह पाटील यांचे सावत्र भाऊ-बहिण आहेत. मात्र दोघांमध्ये राजकीय मतभेद असल्याने आर्थिक अथवा व्यावसायिक संबंध नव्हते. अमरसिंह पाटील हे तेर येथे शेती व्यवसायात गुंतलेले होते. ते 2016 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर सक्रिय राजकारणापासून दूर राहिले. पुढे काही काळ ते बारामती आणि पुण्यात राहिले. वर्ष 2018 मध्ये अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.

दिग्विजय पाटील यांचे बालपण सुनेत्रा पवार यांच्या देखरेखीखाली गेले. प्राथमिक शिक्षण बिबेवाडी, पुणे येथे तर उच्च शिक्षण एमआयटी महाविद्यालयातून बीए पदवीपर्यंत पूर्ण झाले. सध्या ते आई आणि आजीसह पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यामुळे ते फक्त घरगुती कार्यक्रमासाठी तेर येथील मूळ गावी येत असत दिग्विजय यांचा धाराशिव येथे कोणताही मोठा उद्योग असल्याचे तूर्तास तरी समोर आले नाही दिग्विजय आणि पार्थ पवार हे समवयस्क असून दोघांमध्ये मैत्री आणि पुढे व्यावसायिक भागीदारी निर्माण झाली.

हे वाचलं का?

    follow whatsapp