मनोज जरांगेंनी सांगितला हत्येचा कट, भाऊबीज दिवशी 2.50 कोटींची दिली सुपारी, मारण्याचे तीन प्लॅन

मुंबई तक

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धक्कादायक दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनीच माझ्या हत्येचा कट रचल्याचा दावा केला आहे.

ADVERTISEMENT

Manoj Jarange Patil Vs Dhananjay munde
Manoj Jarange Patil Vs Dhananjay munde
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जरांगे पाटील यांनी हत्येसाठी तब्बल अडीच कोटी रुपयांची सुपारी

point

हत्येसाठी परराज्यातील जुन्या गाड्या देण्याचे आश्वासन, मनोज जरांगेंचा आरोप 

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धक्कादायक दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनीच माझ्या हत्येचा कट रचल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जालना पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केल्यानंतर मनोज जरांगेंनी पत्रकार परिषद घेत थेट आता धनयंज मुंडेंचं नाव घेतलं आणि राज्याच्या राजकारणा एकच खळबळ उडाली आहे. 

हे ही वाचा : मोठी बातमी! लेकाचा अठराशे कोटींचा जमीन घोटाळा, अजितदादा देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, नेमकी चर्चा काय?

जरांगे पाटील यांनी हत्येसाठी तब्बल अडीच कोटी रुपयांची सुपारी

या प्रकरणात जरांगे पाटील यांनी हत्येसाठी तब्बल अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती. यातील 50 लाख हल्लेखोरांना दिल्याचे मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. या हत्येचा कट हा भाऊबीज दिवशीच एका ठिकाणी बैठक झाली होती, या बैठकीत धनंजय मुंडे यांचा एक निकटवर्तीय सहभागही असल्याचं ते म्हणाले. 

जरांगेंनी सांगितले मारण्याचे तीन प्लॅन

मुंडे यांनी स्वत: झाल्टा फाटा येथे मारेकऱ्यांची भेट घेऊन त्यांना 'आम्ही त्याला ठोकतो' असे सांगितल्यावर, अपघातासाठी लागणारी परराज्यातील जुन्या गाड्या देण्याचे आश्वासनही देण्यात आले, तसेच गोळीबार नाहीतर, खोटे रेकॉर्डिंग बनवून संपवण्याचा प्लॅन त्यांनी रचल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. 

हे ही वाचा : कोरेगाव जमीन प्रकरणी अमेडिया कंपनीविरोधात गुन्हा, पण FIR मध्ये पार्थ पवारांचं नाव नाही! नेमकी क्रोनोलॅाजी समजून घ्या!

या अपघातातील मूळ हा धनंजय मुंडेच आहे, असे थेट वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. आपण खमक्या असून आपण त्यांचे बाप आहोत, जर बेसावध असतो तर वाईट घटना घडून गेल्याचा दावा त्यांनी केला. या घटनेनंतर आता धनजंय मुंडे नेमकी काय प्रतिक्रिया देतील हे बघणं गरजेचं असणार आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp