Viral Video : मावशीकडे सुट्टीला गेलेली तरुणीने 160 फूटावर असताना स्वत:च उघडला सेफ्टी बेल्ट अन्...

Viral Video : युरोपातील मॉन्टेनेग्रो येथे सुट्टी घालवण्यासाठी आलेल्या तरुणीसोबत अनर्थ घडला आहे. 19 वर्षीय सर्बियन मॉडेल तिजाना राडोंजिक असे नाव असून ती पॅरासेलिंग करताना अपघातात मृत्यू झाली आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

viral video a young woman on vacation with her aunt fell from 160 feet while parasailing

viral video a young woman on vacation with her aunt fell from 160 feet while parasailing

मुंबई तक

04 Jun 2025 (अपडेटेड: 04 Jun 2025, 02:39 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

तरुणीचा पॅरासेलिंग करताना अपघात

point

व्हिडिओ तुफान व्हायरल

Viral Video : युरोपातील मॉन्टेनेग्रो येथे सुट्टी घालवण्यासाठी आलेल्या तरुणीसोबत अनर्थ घडला आहे. 19 वर्षीय सर्बियन मॉडेल तिजाना राडोंजिक असे नाव असून ती पॅरासेलिंग करताना अपघातात मृत्यू झाली आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. ज्यामुळे प्रेक्षकांना आणि तिच्या कुटुंबात शोक व्यक्त केला जात आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीवर महिला पोलीस अधिकाऱ्याकडून... आणखी एक बदलापूर बलात्कार प्रकरण

न्यूयॉर्कने दिलेल्या वृत्तानुसार, तिजाना तिच्या मावशीसोबत सुट्टीसाठी आली होती. त्यावेळी तिने निशुल्क पॅरासिलिंग सत्रात भाग घेतला. मात्र, त्यानंतर जे व्हायला नको होतं तेच झालं. संबंधित तरुणी तब्बल 160 फुटांहून अधिक उंचीवरुन पडून तिचा जीव गेला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

व्हिडिओ व्हायरल

व्हायरल व्हिडिओत एक बिकिनी परिधान केलेली तिजाना खूप घाबरलेली दिसत आहे. याचदरम्यान, तिने तिचे लाईफ जॅकेट ओढले आणि त्यानंतर तिने सेफ्टी बेल्ट ओढण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. त्याच दुसऱ्या क्षणी, ती कंबरेचा बेल्ट उघडण्याचा प्रयत्न करते. तसेच त्यातून स्वत:ला सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसते, यावेळी तिचा तोल जातो आणि ती भीषण अपघाताची बळी ठरली आहे. अशावेळी तिचा जागीच मृत्यू झाला असल्याचे व्हिडिओत दिसते. 

पॅरासेलिंग कंपनीचे मालक मिर्को क्रडजिंक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, या अपघाताने मन सुन्न झाले. आम्ही सर्वजण हा अपघात पाहून हादरून गेलोय. दरम्यान, मृत तरुणीच्या कुटुंबियांच्या घरी शोक व्यक्त केला जात आहे. तिच्या कुटुंबियांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिलं की, तू सदैव आमच्या स्मरणात राहशील. 

हेही वाचा : बुध ग्रहाचा मिथून राशीत होणार प्रवेश, 'या' पाच राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार

दरम्यान, संबंधित प्रकरणात पोलिसांनी अद्याप या घटनेबाबत ठोस माहिती दिली नाही. हा अपघात होता की, जाणुनबुजून घडवून आणलेलं कृत्य आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

    follow whatsapp