Odisha Train Accident Reason : अखेर रेल्वे अपघाताचं कारण सापडलं!

मुंबई तक

04 Jun 2023 (अपडेटेड: 04 Jun 2023, 07:35 AM)

odisha train accident what happened : रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी केली आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये बदल झाल्यामुळे हा अपघात झाला आहे.

What caused balasore train accident? balasore train accident reason

What caused balasore train accident? balasore train accident reason

follow google news

Odisha train accident reason in marathi : बालासोर येथे झालेल्या तीन रेल्वे गाड्यांच्या दुर्घटनेनंतर रुळावरील अडथळे बाजूला करून रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव स्वतः अपघातस्थळी उपस्थित असून, ट्रॅकच्या दुरुस्तीच्या कामावर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, या दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांची ओळख पटली असून, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे मोठे वक्तव्य रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले आहे. बुधवारी सकाळपासून रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (Balasore train accident happened due to change in electronic interlocking, Railway Minister for the first time told the reason for the accident)

हे वाचलं का?

दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांची ओळख पटली

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, ममता बॅनर्जी यांनी सांगितले ते कारण नाहीये, तर अपघातामागे दुसरे काही कारण आहे. ममता बॅनर्जींच्या आरोपांवर रेल्वेमंत्री म्हणाले, ‘ममता बॅनर्जी यांनी काल जे सांगितलं त्या कवचशी काहीही संबंध नाही.’ ते पुढे म्हणाले, ‘रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी केली आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये बदल झाल्यामुळे हा अपघात झाला आहे. तपास अहवाल येऊ द्या. आम्ही घटनेची कारणे आणि त्यासाठी जबाबदार लोक ओळखले गेले आहेत. सध्या आमचे लक्ष ट्रॅकच्या दुरुस्तीवर आहे.’

हेही वाचा >> ‘4 वर्षात 2 डझन आमदार झाले, पण मी पात्र नाही…’, पंकजा मुंडे आता खेळणार मोठा डाव

बुधवारपासून पूर्ण ट्रॅक कार्यान्वित होईल

बुधवारी सकाळपर्यंत हा ट्रॅक कार्यान्वित होईल, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले असून बुधवारी सकाळपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे आमचे लक्ष्य आहे जेणेकरून या ट्रॅकवरून गाड्या धावू शकतील.’ अश्विनी वैष्णव पुढे म्हणाले, ‘पंतप्रधानांनी काल दिलेल्या सूचनांवर वेगाने काम सुरू आहे. काल रात्री ट्रॅकचे काम जवळजवळ पूर्ण झाले. आज एक ट्रॅक पूर्णपणे दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जाईल. सर्व बॉक्स काढण्यात आले आहेत. मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. काम वेगाने सुरू आहे. बुधवारी सकाळपर्यंत सामान्यपणे मार्ग सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

धर्मेंद्र प्रधान काय म्हणाले?

त्याचवेळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, ‘शक्य तितक्या लवकर सामान्य स्थिती प्रस्थापित करणे ही आमची जबाबदारी आहे. भारतीय रेल्वे मोफत ट्रेन चालवत आहे. मृतांचा आकडा 270 च्या वर गेला आहे. त्यामागची कारणे तपासली जात आहेत. याला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करू.’

हेही वाचा >> Sakshi Murder Case : “डोक्याचे झाले होते चार तुकडे, पोटातील आतडेही…”

ओडिशाच्या बालासोरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी तीन रेल्वे गाड्यांच्या झालेल्या भीषण धडकेत आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला आहे, तर हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. बचाव आणि मदत कार्यानंतर, रेल्वेने शनिवारी रात्रीच रुळांवरचा बहुतांश मलबा हटवला असून लवकरच ट्रॅक सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

    follow whatsapp