Google Golden Baba : प्रयागराजमध्ये सध्या सगळीकडे माघ मेळ्याची धामधूम सुरु आहे. भारतभरातील संत, साधू आणि लाखो भाविक प्रयागराजच्या संगमावर एकवटले आहेत. या सगळ्यांमध्ये लक्ष वेधून घेतले आहे ते गुगल गोल्डन बाबाने. अंगावर सोनं, चांदीचा मुकुट, चांदीचं चप्पल अशा पहरावामुळे सर्वांना या बाबांबद्दल आश्चर्य आणि त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. त्यांचे खरे नाव मनोज आनंद महाराज असून त्यांच्या शरीरावर तब्बल पाच कोटी रुपयांचे सोने आहे. यामुळे त्यांच्यावर अनेकदा हल्लेही झाले आहेत. तरीही, ते निर्भयपणे आपला प्रवास सुरू ठेवतात. त्यांनी स्वतः संपूर्ण कहाणी सांगितली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पुण्याचा महापौर कोण होणार? 'ही' तीन नावं चर्चेत; निर्विवाद वर्चस्व मिळवल्यानंतर भाजपपुढे नवा पेच
सोन्यात मढलेला गुगल गोल्डन बाबा
अंगावरील सोने आणि चांदीमुळे चर्चेत आलेला गुगल गोल्डन बाबा तब्बल पाच कोटी रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने परिधान करतात. बाबा त्यांच्या गळ्यात सोन्या-चांदीने जडवलेला शंख, रुद्राक्षाचे मणी आणि दोन्ही हातात जड बांगड्या आणि साखळ्या घालतात. त्यांच्या पाच बोटांमध्ये देव-देवतांच्या आकृत्या कोरलेल्या सोन्याच्या अंगठ्या असतात. डोक्यावर चांदीचा मुकुट असतो. त्यांच्यासोबत नेहमी एक सोन्याचा बाळकृष्ण असतो. ते चांदीच्या भांड्यांमध्ये अन्न खातात आणि चांदीच्या ग्लासमधून पाणी पितात. तसेच एकेकाळी ते पायात चार किलोंचे चांदीचे बूट घालत असत.आग्र्यातून त्यांनी हे बूट बनवून घेतले होते. त्यावेळी चांदीची किंमत प्रति किलो सुमारे 40 हजार रुपये होती आणि प्रत्येक जोड्याची किंमत दीड ते दोन लाख रुपये असल्याचे म्हटले जाते. पण आता बाबा अनवाणी चालतात. त्यांनी केलेला एक संकल्प पूर्ण झाला की ते चप्पल पुन्हा घालायला सुरु करतील.
अंगावरील दागिन्यांमुळे जीवघेणे हल्ले
अंगावर असलेल्या कोट्यवधींच्या दागिन्यामुळे बाबांवर आजपर्यंत चार वेळा जीवघेणे हल्ले झाले आहेत. प्रत्येक वेळी, गुन्हेगारांनी बाबांना धमकावण्याचा किंवा इजा करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना पकडून तुरुंगात टाकण्यात आले. याविषयी बाबा म्हणतात की, ' मी सर्व काही देवावर सोपवले आहे. मला खात्री आहे की माझ्या डोक्यावरील एकाही केसाला इजा होणार नाही.' तसेच बाबांना एकदा धमकी मिळाल्यानंतर 'या धमकीचे परिणाम काय होतात ते पहा' अशा आशयाचे होर्डिंग्ज त्यांनी संपूर्ण कानपूरात लावले होते. हल्ल्यांची भीती वाटत नाही का याविषयी बाबा म्हणतात की, 'मला भीती वाटत नाही. ज्याच्यासोबत गिरधारी आहे त्याला घाबरण्याचे काय कारण आहे?'
हे ही वाचा : ‘आम्ही एकत्रितपणे सर्व निर्णय करणार, पळवापळवीची आवश्यकता नाही..’, हॉटेल पॉलिटिक्सवर फडणवीसांची प्रतिक्रिया
कोण आहेत गुगल गोल्डन बाबा?
गुगल गोल्डन बाबा हे कानपूरचे रहिवासी आहेत आणि त्यांना करोली बाबांचे भक्त मानले जाते. ते गेल्या २० वर्षांपासून सोने परिधान करत आहेत. त्यांचे मूळ नाव मनोज आनंद महाराज आहे. त्यांच्या अंगावर पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने आहे. सोन्या-चांदीची ही चमक लोकांना आकर्षित करते.माघ मेळ्यादरम्यान, गुगल गोल्डन बाबांचा कॅम्प भक्तांनी वेढलेला असतो. लोक त्यांना भेटण्यासाठी, फोटो काढण्यासाठी आणि सेल्फी घेण्यासाठी गर्दी करतात.
ADVERTISEMENT











